मोदींच्या गॅरंटीपुढे निभाव लागत नसल्यानं संविधान बदलाच्या अफवा : चंद्रशेखर बावनकुळे | पुढारी

मोदींच्या गॅरंटीपुढे निभाव लागत नसल्यानं संविधान बदलाच्या अफवा : चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर ; पुढारी वृत्‍तसेवा भाजपने नेहमीच घटनात्मक मूल्य आणि राष्ट्रहितासाठी काम केले, भारताचे संविधान बदलणे हे कुणाच्या बापालाही शक्य नाही असा घणाघात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना लक्ष्य केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गॅरंटीपुढे निभाव लागत नाही, त्यामुळे आता भारताचे संविधान बदलणार अशा अफवा पसरवायला सुरूवात केली. ज्येष्ठ नेते शरद पवारही यात सहभागी झाले आहेत, ही अतिशय दुर्दैव बाब असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे. मुळात भारताचे संविधान बदलणे हे कुणाच्या बापालाही शक्य नाही. संविधान अत्यंत मजबूत आहे. शरद पवार ज्या काँग्रेसमध्ये एकेकाळी होते. तो काँग्रेस पक्ष सत्तेत असताना घटना दुरुस्तीच्या नावाखाली संविधान कितीदा बदलविण्यात आले, याचा आकडा पवार साहेबांकडे नक्कीच असणार.

उलट मोदीजी यांच्या नेतृत्वातील सरकारने मागील दहा वर्षात संविधानाचा सन्मानच केला आहे. पंतप्रधान मोदीजींनी संसद भवनाला संविधान सदन असं नाव दिलं आहे. भाजपने नेहमीच घटनात्मक मूल्य आणि राष्ट्रहितासाठी काम केलं आहे. त्यामुळे जनतेनं कुठल्याही नेत्यांच्या भुलथापांना बळी पडू नये. पवार साहेबांच्या तर अजिबातच नाही असे आवाहन केले आहे.

हेही वाचा : 

Back to top button