Maharashtra politics : ठाकरे गटाने गाऱ्हाण्यातून साधला शिंदे गटावर निशाणा | पुढारी

Maharashtra politics : ठाकरे गटाने गाऱ्हाण्यातून साधला शिंदे गटावर निशाणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्रात द्वेषानं सुडाचं राजकारण खेळनाऱ्य़ा, आमच्या पोराबालांच्या पोटाचा रोजगार पलवणाऱ्या, गुंडशाहीने सुसंस्कृत राजकारणाचा पार इस्कोट करणाऱ्या, महाविकास आघाडीचं सोन्यासारख सरकार पाडणाऱ्या कुसक्या प्रवृत्तीला तुझ्याच पायाखाली दाबून ठेवं रं महाराजा, व्हय महाराजा! अस गाऱ्हाणे आपल्या ‘X’ खात्यावर घालत ठाकरे गटाने शिंदे गटावर निशाणा साधला आहे. हे गाऱ्हाणं राजकीय वर्तुळासह सोशल मिडियात चर्चेला आलं आहे. (Maharashtra politics)

मराठी महिन्यातील फाल्गुन पौर्णिमेला येणारा सण म्हणजे होळी. दृष्टप्रवृत्ती, वाईट, अमंगल विचारांचा नाश करून चांगली वृत्ती, चांगले विचार अंगी बाळगावे, हा या सणामागील उद्देश आहे. यंदा रविवारी (दि.२४) हा सण साजरा करत आहेत. दरम्यान टाकरे गटाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या ‘X’ खात्यावर सत्ताधारी पक्षावर निशाणा साधत गाऱ्हाणं घालत होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गाऱ्हाण्यातं म्हटलं आहे की,

Maharashtra politics : सुव्यवस्थेचे तीन तेरा…

“बा देवा महाराजा, व्हाय महाराजा! बारा वेशीच्या, बारा गावाच्या, बारा वाडीच्या महाराजा, व्हाय महाराजा!

आज आम्ही सगली पोरा मिलून, तुझा हा वरसाचा शिमगा सन आनंदात साजरा करतावं हाय रं महाराजा, व्हय महाराजा! तुला आम्ही मानाची फुला लावलेली हायत. सोन्याचा गोला म्हणून नारल दिलेला हाय, तेव्हा महाराष्ट्रात द्वेषानं सुडाचं राजकारण खेळनाऱ्य़ा, आमच्या पोराबालांच्या पोटाचा रोजगार पलवणाऱ्या, गुंडशाहीने सुसंस्कृत राजकारणाचा पार इस्कोट करणाऱ्या, खोक्या-धोक्याच डाव टाकून महाविकास आघाडीचं सोन्यासारख सरकार पाडणाऱ्या कुसक्या प्रवृत्तीला तुझ्याच पायाखाली दाबून ठेवं रं महाराजा, व्हय महाराजा! ह्या मिंध्यांच्या सरकारात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजलयेत, शेतकरी मायबाप टाहो फोडतोय, आया बहिणी सुरक्षित नाय हायत, सरकारच्या मित्रांवर पैशाच्या राशी पडतायतं, म्हणून महाराष्ट्राचं पार वाटोळं करणारं घटनाबाह्य सरकार आता आम्हाला नको रं महाराजा, व्हय महाराजा!

ह्य कोकण आमचं सर्वस्व हाय, आमची मायभुमी हाय तिला आम्ही जीवापाड जपताव हाय, पण आमच्याकडे सध्या चोरांचा सुलसुलाट सुरु झालाय, विनाशकारी प्रकल्पासाठी आमच्या जमिनी म्हणू नको की, रस्त्याचं डांबर म्हणू नको सगळ्यावर झो इथल्या चोरांचा डोला हाय. तेव्हा त्या डांबरचोरांना आणि नाणार गावी नकोत प्रकल्प आणुन, आमच्या कोकणाची वाट लावू पाहणाऱ्या सगळ्यांना धडा शिकव रे महाराजा! झालेली गद्दारी आमाला काय मान्य नाय, त्या गद्दारीचा इथनं आदी नायनाट कर आणि आमच्या महाराष्ट्राचा एक कुटूंबप्रमुख वाघ देशासाठी, महाराष्ट्रासाठी, संविधानासाठी, आमच्या पुढल्या पिढीसाठी लढतोय त्याला तेवढं बल दे आणि सांभाळ कर रे महाराजा, व्हयं महाराजा!”

आता ठाकरे गटाच्‍या या गाऱ्हाण्य़ावर सत्ताधारी पक्षाची काय भूमिका असणार आहे याकडे लक्ष लागून राहीले आहे.

हेही वाचा 

Back to top button