नागपूर : आम आदमी पार्टीची भाजप कार्यालयावर धडक, घोषणाबाजी | पुढारी

नागपूर : आम आदमी पार्टीची भाजप कार्यालयावर धडक, घोषणाबाजी

नागपूर ; पुढारी वृत्‍तसेवा आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना केंद्र सरकारने ईडीच्या माध्यमातून अटक केल्याने आपकडून देशभर निदर्शने करण्यात येत आहेत. नागपुरातील गणेशपेठ भाजप कार्यालय परिसरात आपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी धडक दिली. सुरुवातीला व्हेरायटी चौक येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेसमोर हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या गणेशपेठ गोदरेज आनंदम परिसरातील प्रचार कार्यालयासमोर हे आंदोलन होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. यामुळे पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला. तातडीने या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून देशात दडपशाहीचे राजकारण सुरू असून, आतापर्यंत तीन मुख्यमंत्र्यांना अटक झाली. आता केजरीवाल यांच्यावरील कारवाईने ते अधिकच उघड झाल्‍याची टीका आपकडून करण्यात येत आहे.1 आपचा प्रत्येक कार्यकर्ता आता केजरीवाल समजून पुढे जाईल, ही तर खऱ्या अर्थाने सुरुवात आहे असे म्हणत मुखवटे घातलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत लक्ष वेधले. उत्पादन शुल्क घोटाळा प्रकरणात कुठलेही पुरावे नसताना केजरीवाल यांना अटक केल्याचा आरोप आपने केला आहे.

हेही वाचा : 

Back to top button