Arvind Kejriwal Arrested: विरोधी पक्ष नेत्यांच्या अटकेविरोधी ‘INDIA’ आघाडी निवडणूक आयुक्तांना भेटणार; ममता बॅनर्जी | पुढारी

Arvind Kejriwal Arrested: विरोधी पक्ष नेत्यांच्या अटकेविरोधी 'INDIA' आघाडी निवडणूक आयुक्तांना भेटणार; ममता बॅनर्जी

पुढारी ऑनलाईन डेस्क: केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतिच लोकसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवरच राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून देशातील विरोधी पक्षातील नेत्यांना लक्ष्य करून त्यांना जाणूनबुजून अटक केली जात आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची अटक देखील राजकीय षडयंत्राचा भाग आहे. त्यामुळे याविरोधात इंडिया आघाडीचे नेते आज (दि.२०) केंद्रीय निवडणूक आयुक्तांना भेटणार असल्याची माहिती पं. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एक्स पोस्ट करत दिली आहे. (Arvind Kejriwal Arrested)

Arvind Kejriwal Arrested: सुनीता केजरीवाल यांना संपर्क करत दर्शवला पाठींबा

पुढे मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी म्हटले आहे की, जनतेने निवडून दिलेले दिल्लीचे विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा मी तीव्र निषेध करते. मी वैयक्तिकरित्या केजरीवाल आणि त्यांचे कुटुंबिय पत्नी श्रीमती सुनीता केजरीवाल यांना एकता आणि जाहीर पाठींबा दर्शवण्यासाठी मी त्यांच्याशी संपर्क साधला आहे, असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. (Arvind Kejriwal Arrested)

हा लोकशाहीवरचा उघड हल्ला-ममता

सीबीआय/ईडी तपासांतर्गत जनतेतून निवडून आलेल्या विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना जाणूनबुजून लक्ष्य करून अटक केली जात आहे. त्यानंतर भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर नेत्यांना गैरव्यवहार करण्यास मुभा दिली जाते, हे संतापजनक आहे. हा लोकशाहीवरचा उघड हल्ला आहे, असा आरोप देखील पं. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर केला आहे. (Arvind Kejriwal Arrested)

निवडणूक आयुक्तांसमोर विरोधक आक्षेप नोंदवणार

दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर इंडिया आघाडी आक्रमक झाली आहे. विरोधी पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांवरील कारवाई विरोधी इंडिया आघाडीतील प्रमुख नेते केंद्रीय निवडणुक आयुक्तांची भेट घेऊन, जाणूनबुजून लक्ष्य आणि अटक करण्यावर तीव्र आक्षेप व्यक्त करेल, असेही पं.बंगाल ममता बॅनर्जी यांनी केलेल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे. (Arvind Kejriwal Arrested)

हेही वाचा:

Back to top button