1st May Maharashtra Din 2024 : नागपुरात वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भवादी आक्रमक | पुढारी

1st May Maharashtra Din 2024 : नागपुरात वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भवादी आक्रमक

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी आज बुधवार १ मे रोजी महाराष्ट्र दिनी विदर्भवाद्यांनी आंदोलन केले. संविधान चौकात वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी जोरदार घोषणा दिल्या. १ मे महाराष्ट्र दिन दरवर्षी विदर्भवादी काळा दिवस म्हणून साजरा करतात, आजही विदर्भवादी संविधान चौकात मोठ्या संख्येने एकत्र आले होते. यावेळी आंदोलकांनी काही काळ रस्ता रोखण्याचा प्रयत्न केला.

वेगळ्या विदर्भाचा झेंडा हातात घेवून ‘वेगळा विदर्भ झाला पाहिजे,’ अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी विदर्भ मागासलेला असल्याचे अहमद कादर म्हणाले. विदर्भवाद्यांनी आज या मागणीसाठी तीन ठिकाणी आंदोलन केलीत. अन्याय निवारण संघर्ष समितीच्या प्रमुख माजी खासदार जांबुवंतराव धोटे यांच्या कन्या सामाजिक कार्यकर्त्या ज्वाला धोटे, सुनील चोखारे यांच्या नेतृत्वाखाली शहीद चौक इतवारी येथे विदर्भ चंडिकेचा आशीर्वाद घेत आंदोलन करण्यात आले. यासोबतच विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते माजी आमदार अॅड. वामनराव चटप, मुकेश मासुरकर यांच्या नेतृत्वाखाली व्हेरायटी चौक येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन केल्यानंतर वेगळ्या विदर्भ राज्यासाठी आंदोलन करण्यात आले. भाजपने वारंवार शब्द देऊनही राज्यात, केंद्रात सत्तेत असताना विदर्भातील जनतेच्या ११९ वर्षे जुन्या मागणीची उपेक्षा केल्याचा आरोप करण्यात आला.

हेही वाचा : 

Back to top button