Kripal Tumane : विदर्भातील जागा वाटपाबाबत तिन्ही पक्षांचे नेते निर्णय घेतील : खा. कृपाल तुमाने | पुढारी

Kripal Tumane : विदर्भातील जागा वाटपाबाबत तिन्ही पक्षांचे नेते निर्णय घेतील : खा. कृपाल तुमाने

नागपूर, पुढारी वृत्तसेवा :  भाजपचा विदर्भातील १० जागावर दावा असल्याचे पुढे येत असले तरी तिन्ही पक्षाचे सर्वोच्च नेतेच बसून यावर निर्णय घेतील. अजून जागावाटपाचा कुठलाही निर्णय झालेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बसून यासंदर्भात निर्णय घेतील. जे काही ठरलं असेल तीन नेत्यांमध्येच ठरले असल्याचा दावा रामटेकचे शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने यांनी आज (दि.७) माध्यमांशी बोलताना केला. Kripal Tumane

रामटेक येथे प्रभू रामचंद्राचे वनवासात असताना ४० दिवस वास्तव्य होते. यामुळे १८ ते २२ जानेवारी दरम्यान, भव्य सांस्कृतिक, धार्मिक उत्सव रामटेकला आयोजित केले आहेत. तसेच मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांना निमंत्रण दिल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री दिल्ली दौरा संदर्भात ते म्हणाले की, केंद्र सरकारकडून राज्याला अनेक प्रकल्पांसाठी निधी मिळत असतो. ते घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सतत दिल्लीला जावे लागते. केंद्राकडून करोडो रुपयांचे काम केंद्राकडून मंजूर करून आणले आहे. Kripal Tumane

दरम्यान, शिवसंकल्प अभियानात रामटेक आणि वाशिम मतदारसंघ वगळण्यात आले आहे. याबाबत बोलताना शिवसंकल्प यात्रा पहिल्या टप्प्यात दहा ठिकाणी होत आहे. त्यानंतर २७-२८ जानेवारीला शिंदे गट शिवसेना पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये शिवसंकल्प अभियानाचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. पहिल्या १० मतदारसंघांमध्ये दोन सभा झाल्या आहेत. दुसरा टप्पा हा २ फेब्रुवारीला सुरू होणार आहे. या दुसऱ्या टप्प्यात रामटेक यवतमाळ, वाशिम, ठाणे, मुंबई, पालघर आणि कल्याण या ठिकाणी शिवसंकल्प अभियान होणार आहे. विरोधी गटाला काही काम उरलेले नाही. त्यामुळे ते उगीचच टीका करत आहेत.

हेही वाचा 

Back to top button