Nagpur Rain : नागपूर जिल्ह्यात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता; शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा | पुढारी

Nagpur Rain : नागपूर जिल्ह्यात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता; शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : नागपूर जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांत ढगाळ वातावरणमुळे पावसाच्या शक्यतेने शेतकऱ्यांची चिंता वाढविली आहे. भारतीय हवामान विभाग, प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूरच्या जिल्हास्तरीय अंदाजानुसार आज (दि. ६) तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. तर रविवारी (दि. ७) हवामान कोरडे राहण्याची आणि सोमवारी (दि. ८) तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला आहे. Nagpur Rain

पावसाच्या अंदाजामुळे कापणीला केलेला धान, तूर तसेच वेचणी केलेला कापूस सुरक्षित ठिकाणी साठवावा. धान, तूर व इतर पिकाची मळणी शक्य नसल्यास शेतमाल हा प्लास्टिक शीट किंवा ताडपत्रीच्या सहाय्याने झाकून ठेवावा. कृषी रसायनांच्या फवारणीची कामे पुढील २ ते ३ दिवस पावसाचा अंदाज लक्षात घेता पुढे ढकलावी. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता लक्षात घेता शेतकरी व शेतमजूर बांधवांनी स्वतःची तसेच पशुधनाची काळजी घ्यावी. विजेपासून संरक्षणासाठी झाडाखाली आश्रय घेणे, कटाक्षाने टाळावे. तसेच पशुधनाचा झाडाखाली आश्रय टाळावा. Nagpur Rain

विजांचा कडकडाट होण्याची शक्यता लक्षात घेता गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्या व इतर पाळीव जनावरे मोकळ्या जागेत चरावयास सोडण्याचे टाळावे. जनावरे हे खुल्या पाण्याचे स्त्रोत, नदी किंवा तलाव व ट्रॅक्टर व इतर धातूच्या अवजारांपासून दूर ठेवावे, पावसाचा अंदाज लक्षात घेता, कृषी उत्पन्न बाजार समितीमधील खरेदीदार व इतर शेतमाल खरेदीदारांनी शेतकऱ्यांद्वारा विक्रीसाठी आणलेला शेतमाल उघड्या जागेवर व न ठेवता शेडमध्येच साठवावा, असे आवाहन जिल्हा कृषी हवामान केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, भा. कृ. सं. प केंद्रीय कापूस संशोधन संस्था व प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर यांनी संयुक्तपणे केले आहे.

हेही वाचा 

Back to top button