राममंदिराच्या उद्घाटनानंतर राज्यात मोठा राजकीय बदल : रवी राणा | पुढारी

राममंदिराच्या उद्घाटनानंतर राज्यात मोठा राजकीय बदल : रवी राणा

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : आयोध्या राम मंदिर प्रतिष्ठापना कार्यक्रमानंतर राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष भाजपला पाठिंबा देतील. राष्ट्रीय पक्ष म्हणून केवळ काँग्रेसच राज्यात शिल्लक राहील, असा खळबळजनक दावा आमदार रवी राणा यांनी केला आहे. ते रविवारी (दि.३१) अमरावतीमध्ये माध्यमांशी बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले, येत्या २२ जानेवारीला अयोध्या येथे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे उद्घाटन, प्राणप्रतिष्ठा होणार आहे. देशभर या दिवशी दिवाळी साजरी करावी, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. किंबहुना भाजपने हे इव्हेंट म्हणून सेलिब्रेशन करण्याचे ठरविले आहे. या पार्श्वभूमीवर या प्रतिष्ठापना कार्यक्रमानंतर राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष भाजपला पाठिंबा देतील. केवळ राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेसच राज्यात शिल्लक राहणार आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. इतकेच नव्हे तर अयोध्येत रामममंदिराच्या उद्घाटनानंतर राज्यात पुन्हा मोठा राजकीय बदल पहायला मिळणार आहे, असा दावा देखील आमदार रवी राणा यांनी यावेळी केला. या दाव्याने आता विदर्भासह राज्यात वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा :

Back to top button