Happy New Year : न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियामध्ये नेत्रदीपक आतषबाजीत नवीन वर्षाचे स्‍वागत | पुढारी

Happy New Year : न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियामध्ये नेत्रदीपक आतषबाजीत नवीन वर्षाचे स्‍वागत

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : नव्या आकांक्षा…नवे संकल्प करत नववर्षाचे भव्‍य स्‍वागत करण्‍यासाठी जग सज्‍ज झाले. न्यूझीलंडमध्ये नवीन वर्षाचे सेलिब्रेशन सुरू झाले आहे. नवीन वर्ष प्रथम ऑकलंडमध्ये साजरे करण्यात आले. लोकांनी फटाक्यांची आतषबाजी करून नवीन वर्षाची सुरुवात केली. भारताच्या पूर्वेकडील देशांमध्ये म्‍हणजे जपान, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये नववर्षाच्‍या स्‍वागताची धूम सुरु झाली आहे. भारतीय वेळेनुसार रविवारी सायंकाळी या देशांमध्ये नवीन वर्षाचे सेलिब्रेशन सुरू झाले आहे. (Happy New Year)

Happy New Year : नवीन वर्षाचे सेलिब्रेशन सुरू

गतवर्षीच्‍या स्‍मरणीय स्‍मृतींना पुन्‍हा उजाळा देत आणि कटू आठवणी विसरुन सारेजण नववर्षाच्‍या स्‍वागतासाठी सज्‍ज झाले आहेत. आज मध्यरात्री 12 नंतर भारतात आणि जगभरात नव्या आकांक्षा…नवे संकल्प करत नवीन वर्ष साजरे होणार आहे. नववर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी देशभरात सुरू आहे. नवीन वर्ष प्रथम भारताच्या पूर्वेकडील देशांमध्ये म्‍हणजे जपान, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये साजरे केले जाईल. भारतीय वेळेनुसार रविवारी सायंकाळी या देशांमध्ये नवीन वर्षाचे सेलिब्रेशन सुरू झाले आहे.

न्यूझीलंडमध्ये नवीन वर्षाचे सेलिब्रेशन सुरू झाले आहे. नवीन वर्ष प्रथम न्‍यूझीलंडमधील ऑकलंडमध्ये साजरे करण्यात आले. येथे नेत्रदीपक आतषबाजी करत नागरिकांनी नूतन वर्षाचे भव्‍य स्‍वागत केले.

किरिबाटी हे पॅसिफिक राष्ट्र 2024 नवीन वर्ष साजरे करणारा पहिला देश बनला आहे. देशातील सर्वात मोठे बेट, ज्याला ख्रिसमस बेट असेही म्हणतात. किरिबास म्हणून उच्चारल्या जाणार्‍या किरिबातीमध्ये विषुववृत्तीय पॅसिफिकमध्ये पसरलेल्या 33 प्रवाळांचा समावेश आहे, जे पूर्वेकडून पश्चिमेकडे सुमारे 4,000 किमी आणि उत्तर ते दक्षिणेकडे 2,000 किमी पेक्षा जास्त पसरलेले आहे.

किरिबाटीनंतर न्यूझीलंडच्या ऑकलंडने देखील 11:00 (GMT) वाजता ऑकलंड स्काय टॉवरवरून फटाक्यांच्या प्रदर्शनासह आणि शहराच्या हार्बर ब्रिजवर लाइट शोद्वारे वर्ष 2024 चे भव्‍य स्वागत केले.

नवीन वर्षाचे सेलिब्रेशन अंतिम टप्प्यात आल्याने ऑस्ट्रेलियातही फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये, सिडनी हार्बर ब्रिज प्रसिद्ध मध्यरात्री फटाक्यांच्या प्रदर्शनाचा आणि प्रकाश शोचा केंद्रबिंदू बनेल जो जगभरातील सुमारे 425 दशलक्ष लोक दरवर्षी पाहतील अशी अपेक्षा आहे. जगातील सर्वात चित्तथरारक नवीन वर्षाच्या फटाक्यांच्या प्रदर्शनांपैकी एकासाठी सिडनीमध्ये प्रचंड गर्दी जमत आहे. यानंतर, टोंगा आणि सामोआ हे नवीन वर्षाचे स्वागत करणार आहेत, येत्या काही तासांत लाखो लोक जगभरातील उत्सवांमध्ये सहभागी होण्‍याची अपेक्षा आहे.

हेही वाचा : 

Back to top button