चंद्रपूरात सुमारे २५ लाखाची रोकड जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई | पुढारी

चंद्रपूरात सुमारे २५ लाखाची रोकड जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : बल्लारपूर चंद्रपूर मार्गावरून मोटारसायकलने काळ्या बॅगमध्ये रोकड घेऊन जाणाऱ्या एका संशयीताला सुमारे 25 लाखांच्या रोकडसह स्थानिक गुन्हे शाखेने आज गुरूवारी (8 मार्च) रात्री ताब्यात घेतले आहे. ऐन लोकसभा निवडणूकीची तयारी सुरू असतानाच रोकड आढळून आल्याने वेगवेगळे वर्तवितर्क लावले जात आहेत. पोलिस या घटनेच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. नगदी २४ लाख ७५ हजाराची रोकड जप्त करून ज्ञानेश्वर रमेश चंनदबटवे (वय 34) रा. नागपूर याला संशयीत म्हणून ताब्यात घेतले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेला काल गुरूवारी गोपनिय माहिती मिळाली की, बल्लारशा कडून चंद्रपूरकडे एक इसम दुचाकीवर काळ्या बॅगमध्ये मोठ्या प्रमाणात नगदी रोकड घेवून येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्याआधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. महेश कोंडावार यांनी सहायक पोलिस निरीक्षक हर्षल एकरे, पो.उपनि. विनोद भुरले, पो.हवा. संजय आतकुलवार, ना.पो. कॉ. संतोष यलपुलवार, पो.कॉ. गोपाल आतकुलवार, नितीन रायपूरे याचे पथकाने बल्लापूर मार्गावर विसापूर टोलनाक्या समोरील वळणार सापळा रचला. दुचाकीवरून एक इसम पाठीवर बॅग लटकवून येत असताना दिसला. त्याला थांबवून त्याची चौकशी केली असता त्याच्या जवळील काळ्यारंगाच्याबॅगची तपासणी केली असता, त्यामध्ये नोटांचे बंडल रोकड आढळून आली. ज्ञानेश्वर रमेश चंनदबटवे (वय 34) असे संयशयीताचे नाव आहे. बॅगमध्ये 22 लाख 26 हजाराच्या पाचशे रूपयाच्या 4652 नोटा तर 1 लाख 49 हजाराच्या दोनशेच्या 745 नोटा असा एकूण 24 लाख 75 हजाराची नगदी रोकड आढळून आली आहे. ऐवढी मोठी रोकडे कुणासाठी आणि कोणत्या कामाची कामसाठी वापरली जाणार होती, याविषयी प्रश्न निर्माण झाले आहेत. एकीकडे लोकसभा निवडणूकीचे वातावरण तापायला लागले असतानाच सुमारे 25 लाखाची रोकड चंद्रपूरता आढळून आल्याने तर्कवितर्क लावले जात आहेत. संशयीताविरोधात कलम 41(1) (ड) दं.प्र.सं. अन्वये कारवाई करून रोकड ताब्यात घेण्यात आली आहे. पोलिस या घटनेच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे रोकड कुणाची हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

Back to top button