भंडाऱ्यातील हिंदुस्थान कंपोझिट कंपनीला आग, मशिनसह साहित्य जळाले | पुढारी

भंडाऱ्यातील हिंदुस्थान कंपोझिट कंपनीला आग, मशिनसह साहित्य जळाले

भंडारा; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय महामार्गावरील भंडारा एमआयडीसी येथील हिंदुस्थान कंपोझिट कंपनीला अचानक आग लागल्याची घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. यात कोणतीही जिवीतहानी झाली नसली तरी कंपनीतील मशिन आणि साहित्य जळाल्याने मोठे नुकसान झाले.

हिंदुस्थान कंपोझिट या कंपनीत वाहनांचे क्लच प्लेट बनविले जाते. शनिवारी कंपनीला सुटी असल्याने सर्व प्लांट बंद होते. सुरक्षारक्षकाशिवाय कंपनीत कुणीही नव्हते. दरम्यान, शनिवारी दुपारच्या सुमारास कंपनीतून धूर निघत असल्याचे दिसताच सुरक्षारक्षकांनी वरिष्ठांना कळविले. त्यानंतर भंडारा आणि लाखनी येथील अग्निशमन वाहनांद्वारे आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.

कंपनीतील आरडब्ल्यूबी या युनिटमध्ये ही आग लागल्याची माहिती आहे. आगीत मशिन आणि साहित्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे सांगण्यात येत असले तरी चौकशीअंती आगीचे मूळ कारण आहे.

Back to top button