नाशिक : पुढारी वृत्तसेवा – नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाकरीता शनिवारी (दि.१) दुसऱ्या दिवशी चौघा इच्छुकांनी अर्ज खरेदी केले. तर दिवसभरात एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाले नाही, अशी माहिती विभागीय आयुक्तालयाकडून देण्यात आली. दरम्यान, रविवारी (दि.२) अर्ज स्विकृती व विक्री थंडावणार आहे.
नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार व नगर अशा पाच जिल्ह्यांचा मतदारसंघ असलेल्या नाशिक शिक्षक मतदारसंघाची रणधुमाळी सुरु झाली आहे. अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत दुसऱ्या दिवशी एकही नामनिर्देशन पत्र आले आहे. तर दिवसभरात धुळ्याच्या शुभांगी पाटील, नाशिकच्या देवळाली गावातील रतन चावला, नाशिकचे अशोकस्तंभ येथील सुनील सानप तसेच येवल्याचे गोकूळ दराडे या चार इच्छूकांनी अर्ज खरेदी केले.
निवडणूकीत शुक्रवारी (दि. ३१) पहिल्या दिवशी दोघा उमेदवारांनी तीन अर्ज दाखल केले. तसेच दिवसभरात ३९ अर्जांची विक्री झाली. दरम्यान, रविवारची सुट्टी असल्याने अर्ज प्रक्रीया थंडवणार आहे. साेमवारपासून (दि.३) पुन्हा एकदा प्रक्रीया सुरू होेणार असून सात जून ही उमेदवारी अर्जाची अंतिम मुदत असणार आहे. दरम्यान, यंदा महायुती व महाआघाडीकडून निवडणूकीचे तिकिट मिळवण्यासाठी इच्छूकांची संख्या अधिक आहे. त्यामूळे या लढाईत कोण बाजी मारणार हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
हेही वाचा: