विजय वडेट्टीवार भाजपमध्ये जाणार नाहीत: बाळासाहेब थोरात | पुढारी

विजय वडेट्टीवार भाजपमध्ये जाणार नाहीत: बाळासाहेब थोरात

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : विजय वडेट्टीवार भाजपमध्ये प्रवेश करण्यासंदर्भात वारंवार चर्चा केली जाते, याकडे लक्ष वेधले असता विजय वडेट्टीवार सध्या विरोधीपक्ष नेता म्हणून चांगले काम करत आहेत. ते काल देखील आमच्या सभेत होते, त्यामुळे ते भाजपमध्ये जाणार नाहीत, असा दावा काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी केला.

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर धुळेमध्ये काही प्रमाणात नाराजी होती. मात्र, ती नाराजी आता दूर झालेली आहे. शोभा बच्छाव यांच्या प्रचाराला आता चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशाल पाटील यांनी सांगलीत अपक्ष अर्ज भरला. पण या विषयावर आमची बैठक झाली. काँग्रेसची ही जागा आम्हाला हवी होती. शिवसेनेने आग्रह धरला. विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

मात्र, त्यांना काँग्रेसकडून AB फॉर्म देण्यात आलेला नाही. सध्या आमचा त्यांच्याशी संवाद सुरू आहे, असे थोरात यांनी सांगितले. नगरची निवडणूक चौथ्या टप्प्यात आहे. अजून एक महिना कालावधी आहे. हळूहळू सर्व नेते पदाधिकारी प्रचारासाठी तेथे जातील. मोदी सरकारला ही निवडणूक कठीण वाटत होती म्हणूनच महाराष्ट्रात मतदानाचे पाच टप्पे ठेवण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा  

Back to top button