अशांतता निर्माण करणाऱ्या शक्ती कमकुवत होत आहेत: मनमोहन वैद्य | पुढारी

अशांतता निर्माण करणाऱ्या शक्ती कमकुवत होत आहेत: मनमोहन वैद्य

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : संघ स्वयंसेवकांना प्रतिकूल परिस्थितीत काम करण्याची आधीपासून सवय असून हळूहळू सीमावर्ती भागातही अशांतता निर्माण करणाऱ्या शक्ती कमकुवत होत आहेत. दुसरीकडे देशभरात संघ संघटन वाढत आहे. अल्पसंख्याक समाजाचेही गैरसमज दूर होत असून ते अधिक जवळ येत आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह मनमोहन वैद्य यांनी केले. ते आज (दि.१५) पत्रकार परिषदेत बोलत होते. Manmohan Vaidya

देशभरातून आलेले 1500 प्रतिनिधी, भाजप, विहिंप, राष्ट्रसेविका समिती अशा ३६ संबंधित संघटनांचे प्रतिनिधींच्या उपस्थित होणाऱ्या या बैठकीत देशापुढील आर्थिक, सामाजिक आणि शेतकरी प्रश्नी या बैठकीत चर्चा होणार का ?, असे विचारले असता यावेळी नाही, असे वैद्य यांनी स्पष्ट केले. Manmohan Vaidya

ते पुढे म्हणाले की, अयोध्येत श्री राम मंदिर लोकार्पणनंतर सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने संघाची भूमिका याबाबतीत एक प्रस्ताव आणि नव्या सरकार्यवाह यांची तसेच नव्या कार्यकारिणीची निवड होणार आहे. आमच्या मते भारताचा १४० कोटी समाज हिंदू आहे, कारण आमचे पूर्वज हिंदू होते, आमची संस्कृती एक आहे, आमची भारत माता आहे, ज्यांना संघ शाखेत अल्पसंख्याक म्हटले जाते, ते संघाच्या कार्यात सक्रिय आहेत, त्यांची भीती होती. संघाबद्दल मनात गैरसमज निर्माण झाले, ते दूर जात आहे, ते संघाच्या जवळ येत आहेत, असा दावा त्यांनी केला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या वर्षापासून आपल्या अंतर्गत शिक्षण पद्धतीत बदल केले आहेत. या वर्षी प्रात्यक्षिक प्रशिक्षणाचा समावेश करण्यात आला आहे. संघ आपल्या स्वयंसेवकांना क्षेत्रीय प्रशिक्षण देखील देणार आहे, नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याचे हे पहिलेच वर्ष आहे. अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीच्या त्रिशताब्दी वर्षाबाबत आयोजित जनजागरण कार्यक्रम संदर्भात चर्चा व निवेदन करण्यात येणार आहे.

दरम्यान, यंदा लोकसभा निवडणुकीचे वर्ष असल्याने संघाचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन लोकांना जास्तीत जास्त मतदान करण्याची विनंती करतील, असेही वैद्य यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.

हेही वाचा 

Back to top button