Anil Deshmukh : राज्यातील सत्तारूढ पक्षात गँगवार : अनिल देशमुख | पुढारी

Anil Deshmukh : राज्यातील सत्तारूढ पक्षात गँगवार : अनिल देशमुख

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : सत्ताधारी पक्षात एकप्रकारचे गँगवॉर सुरू आहे. महाराष्ट्राने या प्रकारचे गुंडशाही राज्य कधीही पाहिले नव्हते. सत्ताधारीच आपसात भांडत आहेत. कुणावर कुणाचा अंकुश आहे की नाही, कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. पोलीस स्टेशनला जाऊन गोळीबार करणे हे राज्यासाठी नक्कीच पोषक वातावरण नाही, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्य सरकारवर केला. Anil Deshmukh

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वक्तव्य भयानक आहे. जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याचे मी समर्थन करतो. ज्यांनी समाजात, राजकारणात मोठे स्थान दिले त्यांच्याबद्दल असे बोलणे अगदीच अयोग्य आहे. अजित पवार यांनी या स्तरावर जाऊन वक्तव्य करणे चुकीचे आहे. आपल्या राजकारणासाठी खालच्या स्तरावर जाणे महाराष्ट्रातील जनतेला कदापीही आवडणार नाही. ते वडिलांसारखे आहेत. ज्यांनी त्यांना राजकारणात स्थान निर्माण करून दिले, त्यांच्यावर असे वक्तव्य करणे, चुकीचेच आहे यावर देशमुख यांनी भर दिला. Anil Deshmukh

ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही, अशी भावना ओबीसी समाजातील विविध जातीमध्ये आहे. आरक्षण कमी होणार, ओबीसी समाजात भीती आहे, राज्य सरकारने विचार करावा, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

हेही वाचा 

Back to top button