नागपूर : कुणाल राऊत यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी | पुढारी

नागपूर : कुणाल राऊत यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोचे विद्रुपीकरण  केल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

कुणाल राऊत यांनी जिल्हा परिषदेच्या प्रांगणात आंदोलन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला काळ फासल्यामुळे रविवारी रात्री कुणाल राऊत यांना सदर पोलिसांनी अटक केली होती. एकीकडे भाजपने आज (दि.५)  जिल्हा परिषदेच्या परिसरात जोरदार ठिय्या आंदोलन करीत कारवाईची मागणी केली.

 दरम्यान, कुणाल राऊत यांना जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने राऊत यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती राऊत यांचे वकील दीपैन जिगैशी यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

हेही वाचा 

Back to top button