Chandrapur News : ताडोबा व्याघ्र प्रकल्पात झुंजीत २ वाघांचा मृत्यू | पुढारी

Chandrapur News : ताडोबा व्याघ्र प्रकल्पात झुंजीत २ वाघांचा मृत्यू

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा: ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील कोळसा वनपरिक्षेत्रात झुंजीत दोन वाघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मृत्यूमुखी पडलेल्या वाघांमध्ये एक मोठा व बछड्याचा समावेश आहे. या घटनेने ताडोबा व्याघ्र प्रकल्पात खळबळ उडाली आहे. Chandrapur News

वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि.२२) सकाळी कोळसा वनपरिक्षेत्रातील नियतक्षेत्र संगम, उपक्षेत्र झरी कक्ष क्र. 338 पानघाट कुटी परिसरातील खातोडा तलाव क्षेत्रात वनरक्षक आपल्या सहकाऱ्यांसह गस्त करीत होते. या दरम्यान त्यांना दोन वाघांचे मृतदेह आढळून आले. Chandrapur News

एका वाघाचे पृष्ठभागाकडून दुसऱ्या वाघाने अंशता मांस भक्षण केल्याचे आढळून आले.  पूर्णपणे शाबुत असलेला वाघ हा T-142 नर जातीचा आहे. त्याचे अंदाजे वय 6- 7 वर्षे आहे.  दुसरा वाघ हा T-92 या वाघीणीचा मादी बच्चा असून 2 वर्षांचा आहे. दोन दिवसांपूर्वी  रात्रीच्या सुमारास वाघाच्या झुंजीत सदरील दोन वाघांचा मृत्यू झाल्याचा शक्यता वनाधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. या परिसरात कॅमेरा ट्रॅपद्वारे अधिक माहिती गोळा करण्यात येत आहे.

वाघाचे मृतदेह चंद्रपूर येथे पाठविले असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे. वाघांच्या अवयवांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत.

मृत वाघांचा पंचनामा करण्यात आला. यावेळी उपसंचालक (कोर) नंदकिशोर काळे, वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) रुदंन कातकर, बंडू धोतरे, मुकेश बांधककर, वन्यजीव संशोधक क्रीष्णन, ताडोबाचे वन्यजीव पशुवैद्यकिय अधिकारी खोब्रागडे, जीवशास्त्रज्ञ  यशस्वी राव व क्षेत्रीय कर्मचारी आदी उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button