चंद्रपूर : दोन अट्टल घरफोड्या भावांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या | पुढारी

चंद्रपूर : दोन अट्टल घरफोड्या भावांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर शहर व जिल्ह्यात ठिकठिकाणी घरफोड्या करुन ऐवज व रोख रक्कम लांबविणाऱ्या दोन अट्टल घरफोड्यांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी भाऊ आहेत. प्रभु सुब्रमन्यम सानिपती व राकेश सुब्रमन्यम सानिपती असे असे आरोपींचे नाव आहे.

पोलीस दिलेल्या माहितीनुसार, १७ जून २०२३ रोजी पडोली पोलीस स्टेशन अंतर्गत वांढरी येथील फिर्यादी श्रीकांत सुनिल अधिकारी, हे कुटूंबियासोबत रात्री जेवन करून समोरील हॉल मध्ये झोपले असता अज्ञात चोरट्याने दरवाजा तोडून बेडरुमधील लॉकर मधून सोन्या चांदीच्या वस्तूंसह १ लाख ६४ हजार ५०० रुपये व काही महत्वाचे कागदपत्रे चोरुन नेल्याची फिर्याद पडोली ठाण्यात दाखल करण्यात आली होती. तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरोधात कलम ४५७,३८० अन्वये गुन्हा दाख करून तास सुरु करण्यात आला होता. चंद्रपूर शहर व जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या घरफोड्यांचे सत्र पहाता पोलीस अधिक्षक यांचे निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. श्री महेश कोंडावार यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घर फोड्यांचा शोधून काढण्याकरीता तपास सुरु केला होता. घर फोड्यांची गोपनीय माहिती काढण्यात येत होती. पोलीस स्टेशन पडोली, रामनगर, चंद्रपुर शहर, भद्रावती परिसरात पथकोन रवाना होवून घरफोड्या झालेल्या ठिकाणांना भेटी देवून गोपनिय माहिती घेतली.

यामध्ये पोलिस ठाण्याच्या रेकॉर्डवरील अट्टल घरफोडी आरोपी असलेला एक इसम त्याच्या ताब्यातील घरफोडीचे सोन्याचे दागीने स्वतः जवळ बाळगुन विक्री करण्याचे उद्देशाने संशयास्पद स्थितीत रयतवारी चौकात उभा असल्याची माहिती मिळाली होती. सदर इसमास ताब्यात घेवून पोस्टे पडोली हद्दीतील वांढरी फाटा येथे झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यासंबधाने चौकशी केली असता आरोपी प्रभु सुब्रमन्यम सानिपती व राकेश सुब्रमन्यम सानिपती यांनी वांढरी फाटा येथे तसेच जिल्ह्यातील पोस्टे भद्रावती, पोस्टे दुर्गापुर, पोस्टे वरोरा येथे घरफोड्या केल्याची कबुली दिली.

दोन्ही आरोपींना ताब्यात घेवून सखोल चौकशी केली असता पोस्टे पडोली हद्दीतील ३, दुर्गापुर १, भद्रावती २, वरोरा ३ असे ९ गुन्हे उघडकीस आणून सोन्याचे दागीने व नगदी रोख रक्कम ६ लाख ८ हजार ४५० रू. चा माल आरोपींकडून जप्त करण्यात आला.
शहर व जिल्ह्यात विविध ठिकाणी घर फोड्या करणाऱ्यांना दोन्ही आरोपी भावांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास घेतला आहे. पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, अपर पोलीस अधिक्षक रीना जनबंधु, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, सपोनि., जितेंद्र बोबडे, पोउपनि विनोद भुरले, पोहवा. संजय आतकुलवार, स्वामीदास चालेकर, धनराज करकाडे, नापोशि. गजानन नागरे, संतोष येलपुल वार, पोशि. गोपाल अतकुलवार, नितीन रायपुरे, प्रशांत नागोसे, अजय बागेसर तसेच सायबर सेल पोलिसांच्या सहकार्याने कारवाई केली आहे.

हेही वाचलंत का?

 

 

Back to top button