Nagpur News: कोराडीतील सांस्कृतिक केंद्राचे राष्ट्रपतींच्या हस्ते लोकार्पण: रामायण, स्वातंत्र्य समराच्या आठवणींना उजाळा | पुढारी

Nagpur News: कोराडीतील सांस्कृतिक केंद्राचे राष्ट्रपतींच्या हस्ते लोकार्पण: रामायण, स्वातंत्र्य समराच्या आठवणींना उजाळा

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते बुधवारी (दि. ५) सायंकाळी ५ वाजता कोराडी येथे भारतीय विद्या भवनतर्फे निर्मित सांस्कृतिक केंद्राचे लोकार्पण होणार आहे. रामायण आणि स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी या सचित्र केंद्रात जागविल्या जाणार आहेत.

कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार कृपाल तुमाने, भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदी उपस्थित राहणार आहेत.

कोराडी येथे भारतीय विद्या भवनातर्फे रामायण सांस्कृतिक केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. या रामायण सांस्कृतिक केंद्राच्या पहिल्या माळ्यावरील दालनात चित्र स्वरूपात रामायणाची आकर्षक मांडणी करण्यात आली आहे. तर दुसऱ्या माळ्यावरील दालनात १८५७ ते १९४७ या काळातील स्वातंत्र्यवीरांची शौर्यगाथा सचित्र मांडण्यात आली आहे. तीन एकर जागेवर दक्षिण भारतीय शैलीत हे केंद्र तयार करण्यात आले आहे. परमवीर चक्र प्राप्त २० सैनिकांची माहितीही या दालनात आहे.

दुमजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावर महाकाव्य रामायणातील प्रसंग विविध चित्रांच्या स्वरूपात मांडलेले आहेत. चित्रांमधील घटना आणि व्यक्तिमत्त्वे समजून घेण्यासाठी येथे हिंदी, इंग्रजी आणि मराठीत माहिती देण्यात आली आहे. आतील सजावट ही राजवाड्यासारखीच असून, रंगसंगती, ध्वनी व्यवस्था आणि प्रकाश योजना त्याच पद्धतीने करण्यात आली आहे. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर, भारतीय स्वातंत्र्यातील क्रांतिकारकांच्या योगदानावर आधारित चित्र गॅलरी तयार करण्यात आली आहे.

हेही वाचा 

Back to top button