नागपूर : भाजीपाल्याचे भाव कडाडले; फायदा शेतकऱ्यांना की संधीसाधू दलालांना?

भाजीपाला
भाजीपाला
Published on
Updated on

नागपूर ; पुढारी वृत्तसेवा : पावसाळा सुरु होताच भाजीपाल्याचे भाव कडाडले आहेत. यामुळे सामान्य नागरिकांना भाजी खरेदी करताना खूप विचार करावा लागत आहे. टोमॅटोचा भाव १०० ते १२० रुपये प्रती किलो झाला आहे. वांगे, काकडी, कांदे, लसूण, शेंगा हे सगळे प्रत्येकी किलोला शंभरीपार गेले आहेत. परिणामी, बाजारामध्ये भाजीपाला घेण्यासाठी बाजारात आलेल्यांकडून भाजीपाल्याचे भाव पेट्रोल पेक्षाही महाग झाल्याची प्रतिक्रिया कानी पडत आहे. मात्र, खरेच या दरवाढीचा फायदा शेतकरी, भाजी उत्पादकांना होतो की बाजारात मागणीनुसार संधी शोधणाऱ्या दलाल, व्यापाऱ्यांना होतो हे महत्वाचे आहे.

विकासकामांचा गवगवा केला जातो, याबद्दल सरकार काहीच करत नाही. यावर सरकारने काहीतरी ठोस उपाय योजना केल्या पाहिजेत, अशी सर्वसामान्यांची रास्त मागणी आहे. राज्यात भाजीपाल्याचे दर वाढल्याने शहरी भागातील नागरिकांच्या खिशाला कात्री बसत आहे. मात्र, भाजीपाला पिकवणाऱ्या बळीराजाला त्याचा फायदा होताना दिसत नाही.

टोमँटो, प्लॉवर, कोथंबीर, कोबी अशा सर्वच भाज्यांचे सध्या दर चांगलेच वाढले आहेत. ज्या वेळी भाज्यांचे दर वाढतात त्यावेळी आरडाओरड केली जाते. दरम्यान दामू खंडाळ या कळमेश्वर येथून बाजारात आलेल्या मजूर शेतकऱ्याने 'पुढारी' शी बोलताना चांगलेच उत्तर दिले आहे. कितीही रूपये किलोने विक्री होत असेल तरी आम्हाला किलो मागे फक्त दीड रूपया मिळत असल्याची धक्कादायक बाब शेतकऱ्याने बोलून दाखवली.

लेबर, उत्पादन खर्च, मेहनत, निर्सग या सर्व गोष्टी विचारात घेतल्या तर काय उरते? हे ही आमच्या बांधवांनी भाजीपाला खरेदी करतान पहावे आणि मगच भाव ठरवावा असे मत एकनाथ खोब्रागडे या शेतकऱ्याने व्यक्त केले आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news