नागपुरात आतापर्यंत अवकाळीचे ५ बळी | पुढारी

नागपुरात आतापर्यंत अवकाळीचे ५ बळी

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : नागपूर शहर व जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून पावसाची रिपरिप सुरू असून सततच्या पावसाने घर कोसळल्यामुळे टिमकी परिसरात एकाचा मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी या परिसरात संरक्षक भिंत कोसळून मायलेकाचा मृत्यू झाला. तर बेसा परिसरात टीना अंगावर पडल्याने पती-पत्नीचा मृत्यू झाला. अशा प्रकारे नागपुरात आतापर्यंत वादळी पावसाने पाच जणांचा बळी घेतला आहे.

मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर तहसील पोलीस स्टेशनच्या हद्दीत शिकस्त घराचे छत कोसळून 50 वर्षीय अशोक येरपुडे यांचा मृत्यू झाला. गुलाबराव गुरव यांचे हे घर असून दोन खोल्यांच्या घरात अशोक येरपडे आणि त्यांचे कुटुंब राहत होते. जेवण केल्यानंतर आराम करत असताना हे छत कोसळले. नागरिकांनी धाव घेत त्यांना रुग्णालयात नेले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे मोहननगरातील एका आठ मजली इमारतीची संरक्षक भिंत कोसळली. यात सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही.

दरम्यान, शिकस्त घरांच्या बाबतीत महापालिका प्रशासन चालढकल केल्यामुळे मृत्यू झाल्याचे आरोप नागरिक, माजी नगरसेवकांनी केला आहे. तर आजही दुपारपर्यंत पावसाची रिमझिम सुरू होती. काही वेळ ऊन तापल्यानंतर पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण झाले. हवामान विभागाने पुढील तीन दिवस 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वाऱ्यासह पावसाची शक्यता नागपूर व विदर्भातील काही ठिकाणी वर्तविली आहे.

हेही वाचा 

Back to top button