नागपूर : एनएमआरडीएच्या १ हजार ४८० कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी | पुढारी

नागपूर : एनएमआरडीएच्या १ हजार ४८० कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण प्राधिकरणाच्या वार्षिक 1 हजार 480 कोटी रुपयाच्या अर्थसंकल्पास आज (शुक्रवार, दि.१०) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. सामूहिक विकासासोबत पायाभूत सुविधांच्या विकासावर अधिक भर द्यावा, अशा सूचना सुद्धा बैठकीत देण्यात आल्या. नागपूर हे उपराजधानीचे शहर असून या शहराच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्यात येत असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिली.

यावेळी उपमुख्यमंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. बैठकीस मुख्य सचिव मनूकुमार श्रीवास्तव मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी एनएमआरडीएचे महानगर आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी पोलीस आयुक्त अमितेश कुमार महानगरपालिका आयुक्त बी. राधाकृष्णन तसेच वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा 1 हजार 480 कोटी रुपयाचा अर्थसंकल्प महानगर आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी सादर केला, या अर्थसंकल्पामध्ये विकास निधी 394 कोटी चाळीस लाख रुपये अग्रीम कर व ठेवी 59 कोटी रुपये प्रकल्प निधी 1025 कोटी 56 लाख समावेश आहे. सन 2023 – 24 या वर्षात सर्वसाधारण रस्ते व पूल यासाठी 200 कोटी रुपये अमृत दोन योजनेअंतर्गत जलवाहिन्या व मलवाहिन्या टाकण्यासाठी पन्नास कोटी रुपये संरक्षण भिंत बांधण्यासाठी दहा कोटी रुपये एनएटीपी अंतर्गत विकास कामांसाठी 35 कोटी रुपये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दहा कोटी रुपये तसेच वृद्धाश्रम व फायर स्टेशनसाठी पाच कोटी रुपयांच्या कामाचा या अर्थसंकल्पात समावेश आहे.

अर्थसंकल्पामध्ये महालक्ष्मी कोराडी देवस्थान तीर्थक्षेत्र विकास टप्पा तीन व चार साठी शंभर कोटी रुपये, दीक्षाभूमी विकासासाठी 49 कोटी रुपये, स्वदेश तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत 25 कोटी रुपये, अमृत दोन योजनेसाठी 50 कोटी रुपये, फुटाळा तलाव 43 कोटी रुपये व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्वेंशन सेंटर साठी 15 कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. मागील अर्थसंकल्प 21-22 तसेच सुधारित 22-23 मध्ये झालेल्या जमा व खर्चात सुद्धा मान्यता देण्यात आली.

अधिक वाचा :

Back to top button