OYO Founder Ritesh Agarwal : ओयोचे रितेश अग्रवाल यांच्या वडिलांचा २० व्या मजल्यावरुन पडून मृत्यू | पुढारी

OYO Founder Ritesh Agarwal : ओयोचे रितेश अग्रवाल यांच्या वडिलांचा २० व्या मजल्यावरुन पडून मृत्यू

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : ओयो (OYO) चे संस्थापक रितेश अग्रवाल यांचे वडील रमेश अग्रवाल यांचे शुक्रवारी निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुग्राममधील एका उंच इमारतीवरून पडल्याने त्याचा मृत्यू झाला. ओयोच्या प्रवक्त्याने रितेश अग्रवालच्या वडिलांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. यासोबतच रितेश अग्रवाल यांनीही एक निवेदन प्रसिद्ध करून वडिलांचे निधन झाल्याचे म्हटले आहे. (OYO Founder Ritesh Agarwal)

२० व्या मजल्यावरून पडून मृत्यू (OYO Founder Ritesh Agarwal)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री एक वाजण्याच्या सुमारास घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले असता रमेश अग्रवाल यांचा २० व्या मजल्यावरून पडल्याने मृत्यू झाल्याचे दिसून आले. ते डीएलएफ क्रिस्टा सोसायटीत राहत होते. पोलिसांनी म्हणण्यानुसार, ते घराच्या बाल्कनीतून पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा.

पोलिसांनी सांगितले की, अपघाताच्या वेळी मुलगा रितेश अग्रवाल, सून आणि त्याची पत्नीही घरात होते. ७ मार्च रोजीच रितेश अग्रवाल यांचे गीतांशा सूद यांच्या लग्न झाले होते. लग्नानंतर अवघ्या तीन दिवसांनी रितेश अग्रवाल यांच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. (OYO Founder Ritesh Agarwal)

जड अंत:करणाने दिली निधनाची बातमी

या घटनेवर रितेश अग्रवाल म्हणाले. ‘जड अंत:करणाने मी आणि माझे कुटुंब कळवू इच्छिते की आमचे मार्गदर्शक आणि शक्ती असणारे माझे वडील रमेश अग्रवाल यांचे १० मार्च रोजी निधन झाले. त्यांनी मला आणि आपल्यापैकी अनेकांना प्रेरणा दिली. त्यांच्या निधनाने आमच्या कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे.

दिग्गजांनी लावली लग्न समारंभाला हजेरी 

रितेश अग्रवाल यांनी ७ मार्च रोजी २९ वर्षीय गीतांशा सूद यांच्याशी लग्न केले. या प्रसंगी त्यांनी दिल्लीत एक भव्य रिसेप्शन पार्टी दिली. ज्यामध्ये देशातील आणि जगातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. पेटीएमचे सीईओ विजय शेखर पासून ते सॉफ्टबँकचे प्रमुख मासायोशी सोन यांनीही रिसेप्शनला हजेरी लावली. रितेश अग्रवाल हे देशातील सर्वात तरुण अब्जाधीशांपैकी एक आहेत. त्यांनी २०१३ मध्ये ओयो रूम्स सुरू केले.

अधिक वाचा :

Back to top button