यवतमाळ : दोन दुचाकीची समोरासमोर धकड; दोन जण ठार | पुढारी

यवतमाळ : दोन दुचाकीची समोरासमोर धकड; दोन जण ठार

यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा : भरधाव दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यात दोनजण जागीच ठार झाले, तर एक गंभीर जखमी आहे. हा भीषण अपघात गुरुवारी रात्री पांढरकवडा मार्गावर घडला. यातील एका मृताची अजूनही ओळख पटलेली नाही.

दुर्गेश रामदास राठोड (वय २४, रा. जोडमोहा) असे मृताचे नाव आहे. दुर्गेश हा दुचाकीने किन्हाळा येथून जोडमोहाकडे जात होता. याच दरम्यान गणेश शेळके (रा. चंद्रपूर) हा मित्रासह जात होता. गांधीनगरजवळ येताच दोन्ही दुचाकीची समोरासमोर धडक लागली. यात गणेश जखमी झाला असून त्याच्या मित्राचा जागीच मृत्यू झाला. मात्र, त्याचे नाव अद्याप कळू शकले नाही.

घटनेची माहिती मिळताच वडगाव जंगल पोलिस ठाण्याचे जमादार गणेश आगे यांनी घटनास्थळ गाठले. जखमीला तातडीने उपचारार्थ हलविण्यात आले. मृताच्या व जखमींच्या नावाची पडताळणी पोलिसांकडून सुरू होती.

अधिक वाचा :

Back to top button