

यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा: दारव्हा शहरातील कारंजा मार्गावर गोंधळ घालणाऱ्या तिघांना दारव्हा पोलिसांनी ६ जुलैला ताब्यात घेतले होते. त्यातील एकाचा पोलीस ठाण्यातच मृत्यू झाला. पोलीस ठाण्यात मृत्य प्रकरणी सीआयडी तपास करत होती. अखेर पोलीस ठाण्यात मृत्य प्रकरणी सीआयडीने चार पोलिस कर्मचाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
शेख इरफान शेख (३०, रा. रेल्वे स्टेशन दारव्हा) असे पोलीस ठाण्यात मृत्य युवकाचे नाव आहे.
याप्रकरणी पोलीस जमादार पुरुषोत्तम बावणे, पोलिस नाईक सचिन जाधव, पोलीस जमादार संजय मोहतुरे व चालक शब्बीर पप्पूवाले अशी अटक केलेल्या पोलिस कर्मचार्यांची नावे आहेत.
पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याची तक्रार शेख इरफानच्या भावाने दारव्हा पोलीस ठाण्यात केली होती.
तक्रारीची चौकशी सीआयडीचे पोलिस उपअधीक्षक अजय आर. परमार यांच्याकडे सोपविण्यात आली.
परमार यांनी या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचा अहवाल दारव्हा पोलीस ठाण्यात दिला.
याप्रकरणी जमादार पुरुषोत्तम बावणे, पोलिस नाईक सचिन जाधव, जमादार संजय मोहतुरे व चालक शब्बीर पप्पूवाले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरव्ह्यातील या गुन्ह्याचा तपास सीआयडीच्या पोलीस निरीक्षक दीप्ती जोशी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
हेही वाचलं का ?