भ्रष्‍टाचाररुपी राक्षसाचा वध करण्‍यासाठी आंबेमातेने मला शक्‍ती द्‍यावी : किरीट सोमय्या | पुढारी

भ्रष्‍टाचाररुपी राक्षसाचा वध करण्‍यासाठी आंबेमातेने मला शक्‍ती द्‍यावी : किरीट सोमय्या

कोल्‍हापूर ; पुढारी ऑनलाईन: भ्रष्‍टाचाररुपी राक्षसाचा वध करण्‍यासाठी मला शक्‍ती द्‍यावी. असे साकडे मी आंबेमातेला घातले आहे. महाराष्‍ट्राला भ्रष्‍टाचार मुक्‍त करण्‍यासाठी क्रांती सुरु झाली आहे, असे प्रतिपादन भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज येथे केली. भाजप नेते किरीट सोमय्या येथे अंबाबाई मंदिरात ते दर्शनासाठी आले होते. येथे दर्शन घेतल्‍यानंतर त्‍यांनी माध्‍यमांशी संवाद साधला.

यावेळी साेमय्‍या म्‍हणाले की, मुख्‍यमंत्री उद्‍धव ठाकरे यांनी आपल्‍या मित्राला जमीन दिली या घोटाळ्याची सुनावणी सुरु झाली आहे. लोकायुक्‍तांनी या प्रकरणाची सुनावणी सुरु केली आहे, असेही ते म्‍हणाले.

ईडीची कारवाई होताच काही जण हॉस्‍पिटलमध्‍ये दाखल होतात

ईडीची कारवाई होताच काही जण हॉस्‍पिटलमध्‍ये दाखल होतात, असा टोला त्‍यांनी लगावला. ईडीकडून अटक होईल, या भीतीनेच हसन मुश्रीफ हे मुंबईत हॉस्‍पिटलमध्‍ये ॲडमिट झाले होते, असा आरोपही त्‍यांनी केला.

महाराष्‍ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार हे जनतेला लुटत आहे, त्‍याचा पाठपुरावा करणे हेच माझे काम आहे. मात्र खासदार भावना गवळी यांच्‍या भ्रष्‍टाचारावर मी बोललो. मी विदर्भ दौर्‍यावर गेल्‍यानंतर खासदार भावना गवळी यांच्‍या समर्थकांनी माझ्‍यावर हल्‍ला केला. याच प्रकरणातील शहीद खान याला आज अटक करण्‍यात आली आहे, अशी माहितीही त्‍यांनी दिली.

मला आंबेमातेचे दर्शनपासून रोखण्‍याचा प्रयत्‍नही हसन मुश्रीफ होता. राज्‍य सरकारकडून यंत्रणेचा दुरुोपयोगी होत आहे. घोटाळेबाज ठाकरे सरकार जनतेला लुटत आहे, असा आरोपही त्‍यांनी केला.

माध्‍यमांशी संवाद साधल्‍यानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याबाबत तक्रार देण्यासाठी व पुरावे एकत्र गोळा करण्यासाठी किरीट सोमय्या मरगूडकडे रवाना झाले.

हेही वाचलं का? 

 

Back to top button