bypolls : लोकसभेच्या ३, विधानसभेच्या ३० जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर - पुढारी

bypolls : लोकसभेच्या ३, विधानसभेच्या ३० जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : देशाच्या विविध भागातील लोकसभेच्या 3 आणि विधानसभेच्या 30 जागांसाठी येत्या 30 ऑक्टोबरला पोटनिवडणूक (bypolls) घेतली जाणार असल्याची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मंगळवारी करण्यात आली.

मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि दादरा-नगर हवेली दमण-दीव या तीन लोकसभा मतदारसंघासाठी मतदान पार पडणार आहे. विधानसभेसाठी पोटनिवडणूक होणार्‍या जागेमध्ये महाराष्ट्रातील देगलूर मतदारसंघाचा समावेश आहे. 30 तारखेला मतदान झाल्यानंतर 2 नोव्हेंबर रोजी निकाल केला जाणार आहे.

कोरोनाची परिस्थिती, पूर, सण तसेच इतर बाबींची पाहणी केल्यानंतर पोटनिवडणुकांसाठी (bypolls) 30 ऑक्टोबर ही तारीख निश्चित करण्यात आली आहे, असे आयोगाकडून सांगण्यात आले.

आसाममध्ये सर्वाधिक 5 जागांसाठी मतदान घेतले जाणार असून प. बंगालमधील 4, मेघालय, हिमाचल प्रदेश आणि मध्य प्रदेशातील प्रत्येकी 3, राजस्थान, कर्नाटक आणि बिहारमधील प्रत्येकी 2 तर आंध्र प्रदेश, तेलंगणा, मिझोराम, नागालँड, हरियाणा आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी एका जागेसाठी मतदान होणार आहे.

आसाममध्ये ज्या मतदारसंघात मतदान होणार आहे, त्या मतदारसंघात गोसाईगाव, भवानीपूर, तामूलपूर, मरियानी आणि तोवरा यांचा समावेश आहे. प. बंगालमध्ये दिनहाटा, संतीपूरसह इतर दोन मतदारसंघात तर आंध्र प्रदेशात बडवेल मतदारसंघात मतदान होणार आहे.

बिहारमध्ये कुशेश्वर, तारापूर, हरियानामध्ये इलानाबाद, हिमाचल प्रदेशात फतेहपूर, अरकी, कोटकाई, कर्नाटकात सिंदगी, हनगल तर मध्य प्रदेशात रायगाव, जोबाट मतदारसंघात मतदान होईल. याशिवाय राजस्थानमध्ये वल्लभनगर, धरयिावाड, तेलंगणामध्ये हुजुरागाद येथे मतदान होईल.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : #UPSCResult : ऑडिओ ऐकून केला अभ्यास | अल्पदृष्टी असणारा आनंद पाटील देशात 325 वा

Back to top button