धक्कादायक: यूट्यूबवरील व्हिडिओ पाहून बलात्कारपीडितेने केला गर्भपात | पुढारी

धक्कादायक: यूट्यूबवरील व्हिडिओ पाहून बलात्कारपीडितेने केला गर्भपात

नागपूर, पुढारी ऑनलाईन: नागपुरात बलात्कार पीडितेने घरात एकटी असताना यूट्यूबरील व्हिडिओ पाहून स्वत:चा गर्भपात करून घेतला. या तरुणीने आपल्या प्रियकरावर गंभीर आरोप केला असून सहा वर्षांपासून तो तिच्यावर बलात्कार करत होता.

नागपुरातील रहिवासी असलेल्या युवतीनं सोहेलने २०१६ पासून लग्नाचं आमिष दाखवून तिच्यासोबत लैंगिक संबंध ठेवले.

तो तिला नेहमी फिरायला घेऊन जायचा. तेथे तो तिच्यावर बलात्कार करत असे.

अकोल्यात पावसाचे थैमान; पूरात ५० जनावरे वाहून गेली

नोरा फतेहीच्या neck-deep लेहंगामधील फोटोंनी जाळ आणि धुर संगटच!

प्रियकराने घरच्यांनाही विश्वासात घेऊन लग्न करणार असल्याचे सांगितले. ज्यावेळी घरचे लोक लग्नाचा विषय काढतील तेव्हा तो कारणे सांगून टाळत असे.

काही काळानंतर तो विवाहित असून त्याला मुलगा असल्याचे समोर आले. दरम्यान संबधित तरुणी गरोदर राहिली.

सोहेलने तिला गर्भपात करण्यास सांगितले. त्याने तिला यूट्युबवर व्हिडिओ पाहून गर्भपात करण्यास सांगितले.

त्यानुसार तिने घरात किचनमध्ये वापरात येणाऱ्या साहित्याचा वापर केला. यूट्यूबमध्ये दाखविल्याप्रमाणे तिने गर्भनाळ कापून टाकली.

संबधित युवती सात महिन्याची गर्भवती होती. एक दिवस ती अचानक खाली कोसळल्याने तिला प्रचंड वेदना होऊ लागल्या.

रक्तस्राव सुरू होऊन गर्भपात होण्यास सुरुवात झाली. त्यावेळी प्रियकर सोहल याने तिला व्हिडिओ पाहून त्याप्रमाणे गर्भपात करून घेण्यास सांगितले.

काही वेळाने तिचा गर्भपात झाला. त्यावेळी तिने नाळ कापली. काही वेळाने सोहेल घटनास्थळी पोहोचला. त्यानंतर त्याने भ्रूण दफन केले.

मोबाईल सिम कार्ड विक्रीबाबत मोठा निर्णय : नियमांमध्‍ये झाले बदल

कराड तालुक्यात खुनाची मालिका सुरूच; धारदार शस्त्राने वार करून एकाचा खून

कुटुंबाने घेतली पोलिसांत धाव

गेल्या काही दिवसांपासून सोहेल हा लग्नासाठी टाळाटाळ करत होता. त्याने संबधित युवतीला धोकादायकरित्या गर्भपात करण्यास सांगितल्यानंतर तरुणीच्या कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली. दफन केलेले भ्रूण कब्रस्तानमधून बाहेर काढून त्याचे अवशेष बाहेर काढण्यासाठी मेडिकल कॉलेजच्या टीमला पाचारण केले आहे. संशयित युवकाची दोन लग्ने झाली असून त्याने या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. त्याच्या सांगण्यावरून तिने हा धोकादायक निर्णय घेतल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : 

Back to top button