मोबाईल सिम कार्ड विक्रीबाबत मोठा निर्णय : नियमांमध्‍ये झाले बदल | पुढारी

मोबाईल सिम कार्ड विक्रीबाबत मोठा निर्णय : नियमांमध्‍ये झाले बदल

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मागील काही वर्षांमध्‍ये मोबाईल फोन हा आपल्‍या जगण्‍यातला अभिवाज्‍य भाग झाला आहे. कोरोना काळापासून तर मुलांच्‍या शाळेपासून ज्‍येष्‍ठ नागरिकांचा औषधांपर्यंत अशा विविध कारणांसाठी मोबाईल फोनचा वापर हा अनिवार्य झाला. आता दूरसंचार विभागाने मोबाईल सिम कार्ड विक्री संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. आता मोबाईल सिम कार्ड घेण्‍यासाठी ग्राहकांसाठी नियम करण्‍यात आले आहेत.

ग्राहकांना सिम कार्ड घेताना ग्राहक फॉर्म ( सीएएफ ) भरावा लागतो. ग्राहक आणि टेलिकॉम कंपनीमधील हा एक प्रकारचा करारच असतो.

आता या फॉर्ममध्‍ये काही बदल करण्‍यात आले आहेत.

यासंदर्भात दूरसंचार विभागाने म्‍हटले आहे की, आता देशात अल्‍पवयीन मुलांना मोबाईल सिम कार्ड देण्‍यात येणार नाही. यामुळे आता १८ वर्ष पूर्ण झालेल्‍यांनाच सिम कार्ड दिले जाणार आहे.

कोणत्‍याही टेलिफोन कंपनीला आपल्‍या ग्राहकांना सिम कार्ड देताना १८ वर्ष पूर्ण असणार्‍या ग्राहकांनाच सिम कार्ड देण्‍याची परवानगी असणार आहे.

त्‍यामुळे यापुढे अल्‍पवयीन मुलांना सिम कार्डची विक्री करणे ही अवैध विक्री मानली जणार आहे.

 वयोगटाबरोबरच मानसिक स्‍थितीचाही होणार विचार

नवीन सिम कार्ड खरेदी करणार्‍या ग्राहकाला ‘सीएएफ’ फॉर्म भरावा लागतो. आता यामध्‍ये बदल करण्‍यात आला आहे.

१८ वर्षाखालील मुलांना सिम कार्ड विक्री करता येणार नाही, असे नवीन नियमांमध्‍ये स्‍पष्‍ट करण्‍यात आले आहे.

त्‍याचबरोबर ग्राहकाची मानिसिक स्‍थिती बिघडली असेल तरीही सिम कार्ड विक्री करता येणार नाही.

एका व्‍यक्‍ती किती सिम कार्ड वापरु शकतो?

एक व्‍यक्‍ती किती सिम कार्डचा वापर करु शकते, हा नेहमीच विचारला जाणार प्रश्‍न. मात्र याचे वस्‍तुनिष्‍ठ उत्तर मिळत
नव्‍हते.

एक व्‍यक्‍ती जास्‍तीत-जास्‍त ९ सिम कार्ड खरेदी करु शकतो, असे मानले जात होते.

एक व्‍यक्‍ती हा आपल्‍या नावावर १८ सिम कार्डची खरेदी करु शकतो.

यामध्‍ये ९  सिम कार्डचा वापर मोबाईल फोनसाठी तर ९ सिम कार्डचा वापर मशीन-टू-मशीन ( एम२एम) संवादासाठी वापर केला जावू शकतो.

ग्राहक स्‍वत:च केवायसी करु शकणार

आता सिम कार्ड खरेदीसाठी डिजिटल ‘केवायसी’ होणार आहे. ग्राहकाला आता टेलिफोन कंपनीच्‍या ॲपवरुन स्‍वत:च केवायसी करु शकेल. यासाठी ग्राहकाला एक रुपया शुल्‍क द्‍यावे लागेल.

हेही वाचलं का? 

Back to top button