कराड तालुक्यात खुनाची मालिका सुरूच; धारदार शस्त्राने वार करून एकाचा खून - पुढारी

कराड तालुक्यात खुनाची मालिका सुरूच; धारदार शस्त्राने वार करून एकाचा खून

कराडः पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात खुनाची मालिका सुरू असून शहरात महिलेचा धारदार शस्त्राने खून केल्याची घटना ताजी असताना त्याच दिवशी रात्री धारदार शस्त्राने वार करून एकाचा खून करण्यात आला.

कराड-पुसेसावळी रस्त्यावरील वाघेरी फाट्याजवळ शनिवारी रात्री ही घटना घडली. माहिती मिळताच तालुका पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. रमेश रामचंद्र पवार (वय 40) असे धारदार शस्त्राने खून झालेल्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कराड-पुसेसावळी रस्त्यावर वाघेरी फाट्या जवळ धारदार शस्त्राने रमेश पवार यांचा खून करण्यात आला. शनिवार रात्री ही घटना घडली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

शहरातील रुक्मिणीनगर परिसरात महिलेचा धारदार शस्त्राने खून केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली होती. त्याच दिवशी रात्री दुसरी खुनाची घटना घडल्याने कराड तालुका हादरला आहे. पोलिसांनी संशयिताच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत.

हे ही वाचलं का?

Back to top button