डोंबिवली बलात्कार प्रकरणातील पाच व्हिडिओ क्लिप पोलिसांच्या हाती? - पुढारी

डोंबिवली बलात्कार प्रकरणातील पाच व्हिडिओ क्लिप पोलिसांच्या हाती?

मुंबई, पुढारी ऑनलाईन: डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरणातील संशयितांनी संबधित मुलीवर अत्याचार करून पाच व्हिडिओ क्लिप काढल्याचे समोर आले आहे. या पाचही क्लिप पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. या प्रकरणात हा सर्वात मोठा पुरावा असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

काही आरोपींनी व्हिडिओ डिलिट केले आहेत. ते पुन्हा रिकव्हर करण्यासाठी जप्त मोबाइल फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात आले आहेत.

या प्रकरणातील अजून चार आरोपी पसार आहेत. एका आरोपीला शोधण्यासाठी पोलिस गेले असता त्याने गुंगारा दिला.

जागतिक नदी दिन : राज्यातील नद्यांचा विहंगम दृष्ये पाहिलातं का?

बहार विशेष : ‘हत्या : की आत्महत्या?’

डोंबिवलीच्या ग्रामीण भागातील १५ वर्षीय मुलीवर तिच्या प्रियकराने लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर त्यांच्या मित्रांनी तिच्यावर अत्याचार केले.

या प्रकरणात तब्बल ३३ जणांनी नावे समोर आली होती. यातील २९ जणांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्यांत २ जण अल्पवयीन आहेत.

संशयितांनी पीडितेशी लैंगिक संबध ठेवतानाचे व्हिडिओ काढले असून ते व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केल्याचे बोलले जात आहे.

या तरुणांनी तिचे पाच व्हिडिओ काढले होते. ते व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागल्याचे समजते.

याबाबत पोलिसांकडून अद्याप गोपनीयता पाळण्यात येत आहे.

गेल्या आठवड्यात संबधित मुलीवर सहा जणांनी सामूहिक बलात्कार केला होता. बलात्कार प्रकरणातील व्हिडिओ क्लिप  समोर आल्या होत्या. त्यानंतर ही बाब उघडकीस आली होती.

तिला त्रास होऊ लागल्याने कळवा येथील रुग्णालयात दाखल केले होते. तिची प्रकृती चांगली झाल्यानंतर तिला घरी सोडले.

तिच्या कुटुबाला पोलिस संरक्षण दिले असून बदनामीच्या भीतीने ते नातेवाईकांकडे राहिले आहेत.

अजित पवार म्हणाले, दर्जेदार काम असेल तरच उद्घाटनाला बोलवा

कोल्हापूर : सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांबाबत संभ्रम कायम

महिला वकिलाने घेतले आरोपींचे वकीलपत्र

या बलात्कार प्रकरणातील आरोपींचे वकीलपत्र कोणीही घेऊ नये, असे आवाहन फौजदारी वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्याने केले होते. मात्र, पकडण्यात आलेल्या २९ पैकी १९ आरोपींचे वकीलपत्र ॲड. तृप्ती पाटील यांनी घेतले आहे. या प्रकरणात काही निष्पाप मुलांना गोवण्यात आल्याने त्यांना न्याय देण्यासाठी वकीलपत्र घेतल्याचे पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा : 

Back to top button