अकोल्यात पावसाचे थैमान; पूरात ५० जनावरे वाहून गेली | पुढारी

अकोल्यात पावसाचे थैमान; पूरात ५० जनावरे वाहून गेली

अकोला ; पुढारी वृत्‍तसेवा : अकोल्‍यात पावसाचे थैमान समोर आले आहे. जिल्‍ह्यात शनिवारी मुसळधार पावसाने नदी, नाल्‍यांना मोठा पूर आला आहे. या पुरात ५० ते ६० जनावरे वाहून गेली आहेत. अकोल्‍यात पावसाचे थैमान माजवल्‍याचे व्हिडिओतून या नैसर्गिक आपत्‍तीची भीषणता दिसून येत आहे.

अकोला जिल्ह्यातच नव्हे तर शेजारी असलेल्या अमरावती, बुलडाणा, वाशीम मध्येही गेल्या दोन दिवसांपासून चांगला पाऊस होत आहे. यामुळे अकोला जिल्हयाच्या परिसरात असलेल्या नदी, नाल्‍यांना पूर आला आहे.

शनिवारी पातूर तालुक्यात अतिवृष्टी झाली. यामुळे निर्गुणा नदीला मोठा पूर आला. दरम्यान आंधसावंगी येथील ५० ते ६० जनावरे या पुरात वाहून गेली. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने जनावरांचा शोध घेणे कठीण झाले आहे. जिल्हा प्रशासनाने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

हे ही वाचलं का?

Back to top button