विनय गौडा चंद्रपूरचे नवे जिल्हाधिकारी | पुढारी

विनय गौडा चंद्रपूरचे नवे जिल्हाधिकारी

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांची नागपूर महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी विनय गौडा यांची चंद्रपूरच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली. ते लवकरच चंद्रपूरात रूजू होणार आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर अजय गुल्हाने हे चंद्रपूरचे जिल्हाधिकारी म्हणून रूजू झाले होते. आता त्यांची नागपूर महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.

भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) असलेले विनय गौडा यांनी यापूर्वी दोन वर्षांहून अधिक काळ सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी पदावर काम केले आहे. प्रशासकीय कामात गती आणण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतलेला आहे. कोरोना व अतिवृष्टीच्या संकटात जिल्हा परिषदेने उत्कृष्ट काम केल्याबद्दल तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे कौतूक केले होते. जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचा कार्यकाल संपल्याने २१ मार्च पासून ते जिल्हा परिषदेचा प्रशासकीय काम पाहत होते.

प्रशासनातील अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवत जिल्हयात आवश्यकेतनुसार कामांना प्राधान्य दिले. त्या आधी ते तळोदा येथे प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी म्हणून दीड वर्ष काम पाहिले होते. गौडा यांनी नंदूरबार जिल्हा परिषदेच्या माध्यमातून घरकुल योजनेवर भर दिला होता. योजना प्रभावीपणे राबविणारी नंदूरबार जिल्हा परिषद राज्यात अव्वल ठरली होती.

हेही वाचलंत का?

Back to top button