पुणे: वेश्यागमनासाठी याचचा अन एक दुचाकी घेऊन जायचा, फरासखाना पोलिसांकडून तब्बल 16 दुचाकी जप्त | पुढारी

पुणे: वेश्यागमनासाठी याचचा अन एक दुचाकी घेऊन जायचा, फरासखाना पोलिसांकडून तब्बल 16 दुचाकी जप्त

पुणे, पुढारी वृत्तसेवा: बुधवारपेठेत वेश्यागमानासाठी आल्यानंतर दुचाकी चोरी करून पोबारा करणार्‍या चोरट्याला फरासखाना पोलिसांनी त्याच्या केसाच्या ठेवणीवरून बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून 16 दुचाकी जप्त केल्या आहेत. प्रत्येकवेळी तो पोलिसांना गुंगारा देत होता. मात्र यावेळी तब्बल 200 सीसीटीव्ही फुटेज तपासून त्याला पकडल्याची माहिती पोलिस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सोहेल युनुस शेख (26, रा. पारसी चाळ, देहुरोड रेल्वेस्टेशन जवळ, देहुरोड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. फरासखाना पोलिस ठाण्यातच दाखल असलेल्या 17 गुन्ह्यातील चोरलेल्या 16 दुचाकी त्याच्याकडून जप्त करण्यात आल्या आहेत. शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असताना फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीतूनही दुचाकी चोरीला जात असल्याबाबतचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. गेल्या सहा महिन्यापासून दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले होते. अशा चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी दुचाकी चोरीच्या ठिकाणी असलेले सीसीटिव्ही फुटेज तपासण्यास सांगितले होते. त्या आधारे तब्बल 200 सीसीटीव्ही तपासल्यानंतर पोलिस नाईक वैभव स्वामी आणि प्रविण पासलकर तसेच पोलिस शिपाई सुमित खुट्टे यांना सीसीटिव्हीच्या आधारे देहुरोडपर्यंत माग काढला परंतु तो दिसून आला नाही.

बुधवार पेठेतूनच सर्व वाहने चोरीला जात असल्याने पोलिस संबंधीत आरोपीच्या शोधातच होते. नुकतात सोहेल हा बुधवार पेठेत वेश्यागमानासाठी आला असताना पोलिसांना सीसीटिव्हीतील चोरी करणारा तरूण तोच असल्याचा संशय आल्याने त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याला ताब्यात घेतले. सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरे दिल्यानंतर त्याला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने चोरीचे गुन्हे कबूल केले. त्याने ह्या सर्व दुचाकी देहूरोड येथे त्याच्या राहत्या घराजवळ पार्क केल्या होत्या. त्याच्याकडून 16 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. सहायक पोलिस आयुक्त सतिश गोवेकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक शब्बीर सय्यद, सहायक पोलिस निरीक्षक संतोष शिंदे, उपनिरीक्षक निलेश मोकाशी, अमंलदार रिजवान जिनेडी, माहाविर वल्टे, संदीप कांबळे, किशोर शिंदे, मेहबूब मोकाशी, प्रवीण पासलकर, राकेश क्षीरसागर, अजित शिंदे, सुमित खुट्टे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

लकबी वरून केले अटक

तो वेश्या गमनासाठी बुधवार पेठेते येत होता. येथे आल्यानंतर प्रत्येक वेळी मास्टर चावीने दुचाकीचे लॉक उघडून तो एक दुचाकी चोरून नेत असे. बर्‍याच दिवसांपासून त्याचा हा प्रकार सुरू होता. त्याच आधारे त्याचा माग काढून त्याच्या लकबीच्या व पेहरावावरून त्याला अटक करण्यात आल्याचे वरिष्ठ निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी सांगितले. तसेच काही दुचाकी त्यांनी किरकोळ किंमतीला विकल्या होत्या. त्या देखील गुन्ह्यात जप्त करण्यात आल्या आहेत. एक दुचाकी त्याने राजस्थान येथील एकाला विकली असून ती जप्त करणे बाकी आहे.

Back to top button