भंडारा: विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू | पुढारी

भंडारा: विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

भंडारा: पुढारी वृत्तसेवा : कृषिपंपाचा वीजपुरवठा नादुरुस्त असल्याने ट्रान्सफार्मरवर डिओ टाकीत असताना विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (दि.२) सकाळी लाखांदूर तालुक्यातील चिचोली येथे घडली. शरद यादवराव धोटे (वय ३२, रा. भागडी) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

भागडी येथील शरद यादव धोटे हा शेतकरी चिचोली शेतशिवारातील धान पिकाला पाणी देण्यासाठी गेला असता कृषीपंपाची वीज नादुरुस्त होती. यापूर्वी नादुरुस्तीची तक्रार वीज वितरण कंपनीकडे करण्यात आली होती. मात्र वारंवार दुर्लक्षित करीत असल्यामुळे शरद स्वत:च ट्रान्सफॉर्मरवर डीओ टाकण्यासाठी चढला. अचानक ट्रान्सफार्मरवरील विजेचा जोरदार धक्का लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. बराच वेळपर्यंत तो ट्रान्सफॉर्मरवरच पडून होता.

ही घटना माहित होताच गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलवा, तेव्हाच मृतदेह खाली काढा, असा पवित्रा नागरिकांनी घेतल्याने वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अधिकारी दखणे, सहायक अभियंता हेमके व विद्युत तंत्रज्ञ घटनास्थळी दाखल झाले. शरदचा मृत्यू हा वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे झालेला आहे. त्यामुळे त्याच्या कुटुंबाला आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. शरदच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, आईवडील असा परिवार आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button