बुलढाणा : पशूखाद्याच्या पोत्यांआड लपवलेले दारूचे ८०० बॉक्स उत्पादन शुल्क विभागाकडून जप्त | पुढारी

बुलढाणा : पशूखाद्याच्या पोत्यांआड लपवलेले दारूचे ८०० बॉक्स उत्पादन शुल्क विभागाकडून जप्त

बुलढाणा, पुढारी वृत्तसेवा : आंतरराज्यीय वाहतूक करत असलेल्या एका ट्रकमध्ये पशूखाद्याच्या पोत्यांआड लपवलेले 800 दारूचे बॉक्ससाठा उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने जप्त केले. राष्ट्रीय महामार्गावर खामगाव शहराजवळ टेंभूणी फाट्यावर ही कारवाई करण्यात आली. यात ट्रकसह एकूण 76 लाख 21 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

छत्तीसगढ पासिंगचा ट्रक (क्र. सी.जी. 07 एव्ही 4476 ) हा दारूचा मोठा साठा घेऊन नागपूरच्या दिशेने जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग मुंबईच्या भरारी पथकासह अमरावती,खामगाव बुलडाणा येथील पथकांनी संयुक्तपणे कारवाई करून रात्री टेंभूर्णी फाट्यावर संशयित ट्रक अडवून त्याची झाडाझडती घेतली असता त्या ट्रकमध्ये पशूखाद्याच्या पोत्यांआड मध्यप्रदेशात निर्मिती झालेल्या दारूचे तब्बल 800 बॉक्स आढळून आले.

याप्रकरणी ट्रक चालक मोहनीफ रा.मदनपूर जि.बांदा(उत्तरप्रदेश) याला अटक करण्यात आली आहे. आरोपी ट्रकचालकाला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा

Back to top button