चंद्रपूर : चिमूर येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील दोन कर्मचाऱ्यांना १२ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले | पुढारी

चंद्रपूर : चिमूर येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील दोन कर्मचाऱ्यांना १२ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : कंत्राटी मानधन तत्वावर कार्यरत असलेल्या गणित व अभियांत्रिकी चित्रकला निर्देशकचे मानधन काढून देण्याच्या मोबदल्यात १२ हजारांची लाच घेताना चिमूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील दोन कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज गुरूवारी (१८ ऑगस्ट) रोजी रंगेहाथ पकडले. शांताराम किसनदास राठोड, प्रशांत वसंतराव वांढरे असे संयशीत आरोपींचे नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारकर्ती ही चिमुर येथील रहिवासी असून शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चिमुर येथे तासिका, मानधन तत्त्वावर गणित व अभियांत्रिकी चित्रकला निर्देशक म्हणून कार्यरत आहे. तिचे माहे फेब्रुवारी ते मे २०२२ पर्यंतचे या चार महिन्याचे मानधन काढुन दिल्यात आले. तर उर्वरित तीन महिन्यांचे मानधन काढावयाचे आहे.

यामुळे उर्वरित मानधन काढण्यासाठी शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चिमुर येथील गटनिदेशक (कंत्राटी) शांताराम किसनदास राठोडने ११ ऑगस्ट २०२२ रोजी तक्रारकर्तीकडे बारा हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र, तक्रारकर्तीची लाच स्वरूपात पैसे देण्याची इच्छा नसल्याने तिने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

या तक्रारीची पडताळणी करुन आज गुरूवारी (१८ ऑगस्ट ) रोजी बारा हजार रुपयांची लाच देण्यासाठी सापळा रचण्यात आला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत गटनिदेशक (कंत्राटी) शांताराम किसनदास राठोड व निर्देशक प्रशांत वसंतराव वांढरे यांना बारा हजार रुपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.

पोलीस उपायुक्त तथा पोलीस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक मधुकर गिते, पोलीस उपअधिक्षक अविनाश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. जितेंद्र गुरनुले, नापोकॉ. नरेशकुमार नन्नावरे, नापोका संदेश वाघमारे, पो.अ. अमोल सिडाम, रविकुमार ढेंगळे, म.पो.अ. मेघा मोहुर्ले व सतिश सिडाम यांनी ही कारवाई केली.

हेही वाचलंत का? 

Back to top button