संभाजीराजे निर्णय घेण्यास सक्षम : देवेंद्र फडणवीस | पुढारी

संभाजीराजे निर्णय घेण्यास सक्षम : देवेंद्र फडणवीस

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : संभाजीराजे शिवसेनेत जातात किंवा नाही, शिवसेना त्यांना तिकीट देते किंवा नाही, याबद्दल मला काहीही माहिती नाही. शिवसेनेला काय करायचे आहे, त्याबद्दल ते स्वतः ठरवतील आणि संभाजीराजे स्वतः निर्णय घेण्यास सक्षम आहेत, असे मत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मंगळवारी येथे व्यक्‍त केले.

आपले राज्य आणि आपलेच गृहमंत्री आहेत, म्हणून पोलिस संरक्षणात आमच्या नेत्यांवर हल्ले होत आहेत. आम्ही लोकशाही मानणारे लोक आहोत. त्यामुळे आधी तक्रार करू आणि त्यानंतर कारवाई झाली नाही, तर आम्हीदेखील त्यांना सोडणार नाही, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला यावेळी दिला.

आगामी निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे आणि आता निवडणुका घ्याव्यात की घेऊ नये, हा निर्णय निवडणूक आयोग ठरवेल.

…तर सुप्रिया सुळेंचे स्वागत : फडणवीस

खासदार सुप्रिया सुळेंनी सर्वच महिलांच्या बाबतीत एकसारखा निर्णय घेतला पाहिजे. यापूर्वी नवनीत राणांसोबत जे झाले, तेव्हा त्या काही बोलल्या नाहीत. इतरही अनेक महिलांवर हल्ले झाले, तेव्हाही त्या काही बोलल्या नाहीत. आमच्या पक्षाच्या महिलांना मागील काळात पोलिसांनी वाईट वागणूक दिली, तेव्हाही त्या बोलल्या नाहीत. त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी महिलांबाबत आज जी भूमिका घेतली आहे ती त्यांनी वारंवार घ्यावी, आम्ही त्यांचे स्वागत करू, असा उपरोधिक टोला त्यांनी बालगंधर्व सभागृहात झालेल्या नाट्याच्या प्रकारावर बोलताना लगावला.

Back to top button