नागपूर : वारंवार गैरहजर राहणारे १७ पोलीस कर्मचारी निलंबित : आयुक्तांची कारवाई | पुढारी

नागपूर : वारंवार गैरहजर राहणारे १७ पोलीस कर्मचारी निलंबित : आयुक्तांची कारवाई

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : ठोस कारण न देता वारंवार कामावर गैरहजर राहणाऱ्या तब्बल १७ पोलिसांना नागपूर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी निलंबित केले आहे.

नागपूरचे पोलीस दल कायमच चर्चेत असते. कधी तिथल्या व्यवस्‍थेचे तीनतेरा उडाल्याच्या बातमीमुळे तर कधी पोलिसांच्या बदलीबाबत उचललेल्या सकारात्मक पावलांमुळे ते चर्चेत आहे. परंतु सध्या नागपूरच्या पोलीस दलातील एकाच वेळी १७ कर्मचाऱ्यांच्या निलंबित केले आहे.

आजारी असल्याच्या कारणाने किंवा इतर कुठल्याही कारणाने गेल्या सहा महिन्यापेक्षा जास्त काळ सुट्टीवर असलेल्या आणि वारंवार सूचना देऊनही रुजू न झालेल्‍या कर्मचा-यांचर ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच काही कर्मचारी निलंबनाच्या मार्गावर आहेत. तर यामध्ये पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश होता. दरम्‍यान एकाच वेळी १७ पोलीस कर्मचारी निलंबित होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

हेही वाचा  

Back to top button