वर्धा : काळीपिवळी-ट्रकच्या अपघातात १७ प्रवाशी जखमी | पुढारी

वर्धा : काळीपिवळी-ट्रकच्या अपघातात १७ प्रवाशी जखमी

वर्धा : पुढारी वृत्तसेवा : प्रवाशी घेऊन जाणार्‍या काळीपिवळी वाहन आणि ट्रकच्या अपघातात १७ प्रवासी जखमी झालेत. त्यामध्ये काळीपिवळीचा चालक गंभीररीत्या जखमी असल्याची माहिती आहे. वर्धा ते समुद्रपूर मार्गावर मदनी (दिंदोडा) परिसरात आज दि. २१ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. जखमी प्रवाशांना सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

याबाबत प्राप्त माहितीनुसार, वर्ध्याहून एमएच ३२ बी ६३१ क्रमांकाची काळीपिवळी प्रवासी घेऊन जामकडे जात होती. दरम्यान, एमएच २९ टी १८८१ क्रमांकाचा ट्रक विरूद्ध दिशेने येत होता. यावेळी काळीपिवळी आणि ट्रकच्या अपघातात १७ प्रवासी जखमी झालेत. दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान मदनीजवळ पुजईकडे जाणार्‍या वळण रस्त्यावर हा अपघात घडला. जखमी प्रवाशांना सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी सेवाग्राम पोलिसांनी भेट दिली.

हेही वाचलतं का?

Back to top button