नांदेड : हळद सुकण्यापूर्वीच काळाचा घाला; लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नववधूच्या भावासह ८ ठार

नांदेड : हळद सुकण्यापूर्वीच काळाचा घाला; लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नववधूच्या भावासह ८ ठार
Published on
Updated on

भोकर, जारीकोट; पुढारी वृत्तसेवा : नियतीचा खेळ कधीकधी किती क्रुर असतो याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. स्वप्नातही विचार केला नसेल असा भीषण अपघात भोकर-हिमायतनगर महामार्गावर सोमठाणाजवळ आज (ता.२१) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. या अपघातात अवघ्या तीन दिवसांपूर्वी विवाहबद्ध झालेली नववधू आणि तिच्या भावाचा जागीच मृत्यू झाला. पतीदेव मृत्यूशी संघर्ष करत आहे.

धर्माबाद तालुक्यातील जारीकोट येथील युवतीचा विवाह तीन दिवसापूर्वी उमरखेड तालुक्यातील साखरा येथील युवकासोबत झाला होता. परतणीचा कार्यक्रम आटोपून नातेवाईकांसह मिनी व्हॅनमधून (एमएच-19 -एआर- 3219) पररत असताना समोरून येणार्‍या ट्रकची (एमएच-04-एएल-9955) व्हॅनला धडक बसली.

अवघ्या तीन दिवसांपूर्वी विवाह झालेली नववधू माहेरी परतणीचा कार्यक्रम करून सासरी जात असताना हा अपघात झाला. मिनी व्हॅन आणि ट्रकची धडक झाल्यामुळे ही भीषण दुर्घटना घडली. ही धडक एवढी जबरदस्त होती की घटनास्थळी रक्‍ताचा सडा पडल्यासारखे चित्र होते. मरण पावलेल्यांचे हात पाय तुटून पडले होते. या अपघातानंतर दोन्ही वाहने रस्त्याच्या खाली गेल्याने जेसीबी मशीनच्या सहाय्याने वाहनांना बाहेर काढण्यात आले.

नववधूच्या मांडव परतणीसाठी जारीकोट (ता.धर्माबाद) येथून साखरा (ता.उमरखेड जि.यवतमाळ) येथे जात असताना सोमठाणा शिवारात चटलावार यांच्या धाब्यासमोर हिमायतनगरकडून नांदेडकडे टाटा 407 या वीट वाहतूक करणाऱ्या वाहनाने समोरुन धडक दिल्याने हा अपघात झाला.

या अपघातात पुजा ज्ञानेश्वर पामलवार (वय 21 रा.साखरा, नवरी), दत्ता ज्ञानेश्वर पामलवार (वय 22, नवरीचा भाऊ), माधव पुरबाजी सोपेवाड (वय 30, रा.जांबगाव ता.उमरी), सुनील दिंगाबर धोटे (वय 28 रा.चालगणी ता. उमरखेड, मैजिक चालक), अशी आतापर्यंत मयतांची नावे समोर आली आहेत. दरम्यान, नागेश साहेबराव कन्नेवार (वय 28 रा.जारीकोट) अविनाश संतोष वंकलवाड (रा.तामसा), अभिनंदन मधुकर कसबे (वय 16 रा.वाजेगाव4), सुनीता अविनाश तोपलवार (वय 35, रा.तामसा) अशी जखमींची नावे असून त्यांना नांदेड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातातातील जखमी व मृतांची संख्या अजूनही वाढण्याची शक्यता आहे. माहेर परतणी आटोपून परतत असताना वाटेतच ही दुर्घटना घडली. अपघातातील जखमींना नांदेड व भोकर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हे ही वाचलं का ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news