डोंबिवली-माणकोली पुलाचे काम ८४ टक्के पूर्ण; मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते उद्घाटन | पुढारी

डोंबिवली-माणकोली पुलाचे काम ८४ टक्के पूर्ण; मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते उद्घाटन

डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा : डोंबिवली ते ठाणे हे अंतर आता केवळ २० मिनटात पार करता येणार आहे. बहुचर्चित असणाऱ्या डोंबिवली ते माणकोली पुलाचे काम ८४ टक्के पूर्ण झाले आहे. दरम्यान या पुलाचे उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार असल्याची माहिती स्थायी समिती सभापती दिपेश म्हात्रे यांनी दिली.

या पुलाचे काम २०१४ पासून सुरू आहे. सध्या मुंबईला जाताना मुंब्रा, शिळफाटा, कळंबोली आणि पनवेल या मार्गावरून प्रवास करावा लागत आहे. मात्र हा पूल झाल्यानंतर थेट कल्याण रिंग रोड आणि काटई नाक्यावरून राष्ट्रीय महामार्ग क्र.१६० आणि राष्ट्रीय महामार्ग क्र.८ वरून खोपोली मार्गे वाहतूक वळेल. ज्यामुळे डोंबिवली ते ठाणे या रस्त्याने प्रवासाचा वेळ कमी होईल.

भविष्यात ट्रॅफिकची शक्यता

पुल तयार होईलच यात काही शंका नाही. मात्र, रिंग रुट तयार नसल्याने ट्रॅफिक होणार असल्याची शक्यता अधिक आहे. अद्यापही पळवाचा पूल देखील पूर्ण झालेला नाही. हा पूल तयार करण्यासाठी काही वेगळे तंत्रज्ञान लागते का? असा प्रश्न मनसेचे आमदार राजू पाटील यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचंलत का?

Back to top button