Hindenburg Effect : अदानी – हिंडबर्ग वादाचे पडसाद उमटले ऑस्ट्रेलियात; समुहाच्या अडचणीत वाढ | पुढारी

Hindenburg Effect : अदानी - हिंडबर्ग वादाचे पडसाद उमटले ऑस्ट्रेलियात; समुहाच्या अडचणीत वाढ

सिडनी; पुढारी ऑनलाईन : अदानी समूहाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. त्याची ख्याती परदेशातही पोहोचत आहे. अदानी समूहाच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीचा ऑस्ट्रेलियन रिटायर्ड सेविग्ंसवरही परिणाम होत असल्याचे वृत्त आहे. गार्डियनच्या अहवालानुसार, अनेक ऑस्ट्रेलियन रिटायरमेंट फंडांनी गौतम अदानी यांच्या कंट्रोलिंग कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे, ज्यात क्वीन्सलँडमधील सरकारी कर्मचारी आणि कॉमनवेल्थ बँकेच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. (Hindenburg Effect)

गार्डियनच्या अहवालात काय आहे? (Hindenburg Effect)

गार्डियनच्या अहवालानुसार, अनेक सुपरअॅन्युएशन फंडांनी अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये जास्त परताव्यासाठी सक्रियपणे गुंतवणूक केली होती. अहवालानुसार, ऑस्ट्रेलियाच्या २४३ डॉलर अब्ज फ्युचर फंडाने अदानी समूहाच्या दोन कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. दुसरीकडे, ब्रिस्बेन-मुख्यालय असलेल्या ऑस्ट्रेलियन रिटायरमेंट ट्रस्टने किमान सहा अदानी कंपन्यांमध्ये एक मिलियन डॉलर पर्यंत गुंतवणूक केली आहे. ऑस्ट्रेलियन रिटायरमेंट ट्रस्टची संपत्ती २०० बिलियन डॉलर्स पेक्षा जास्त अधिक आहे.

हा अहवाल 24 जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आला

२४ जानेवारी रोजी अमेरिकन रिसर्च कंपनी हिंडेनबर्गने अदानी समूहाबाबत १०६ पानांचा अहवाल प्रसिद्ध केला. यामध्ये अदानी समूहावर अकाउंटिंग फ्रॉड, स्टॉक मॅनिप्युलेशन आणि मनी लाँडरिंगसह अनेक गंभीर आरोप ठेवण्यात आले होते. हा अहवाल आल्यापासून अदानीच्या शेअर्समध्ये भूकंप झाला आहे आणि कंपनीच्या शेअर्समध्ये जवळपास ८० टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. या वर्षी २४ जानेवारीपासून अदानी समूहाच्या समभागांनी एकत्रितपणे एकूण १३४ अब्ज डॉलरचे बाजारमूल्य गमावले आहे.

अधिक वाचा :

Back to top button