ठाणे : खड्डे बुजवण्यासाठी ‘केडीएमसी’कडून पुन्हा नवीन तंत्रज्ञानाचा वापर! | पुढारी

ठाणे : खड्डे बुजवण्यासाठी 'केडीएमसी'कडून पुन्हा नवीन तंत्रज्ञानाचा वापर!

कल्याण, पुढारी वृत्‍तसेवा : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात रस्त्यावर सतत पडत असलेले खड्डे बुजवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा प्रात्यक्षिक प्रयोग करण्यात आला आहे. आज ( दि. २१ ) सकाळी कल्याण स्थानक परिसरात पडलेला खड्डा या तंत्रज्ञानाचा वापर करून बुजवला आहे.

याबाबत शहर अभियंता यांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आज या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. हे तंत्रज्ञान किती टिकाऊ आहे हे पाहणे महत्त्‍वाचे असल्याचे शहर अभियंता अर्जुन अहिरे म्‍हणाले. हे तंत्रज्ञान बनवणाऱ्या कंपनीचे नाव अल्ट्राफाईन पॉटट्रीट असे असून फिक्स सेटिंग सिमेंट असे या तंत्रज्ञानाचे नाव आहे.

या तंत्रज्ञानाचा वापर करताना खड्ड्यात रसायने मिसळलेले पाणी टाकले त्यानंतर सिमेंट आणि खडी टाकून पुन्हा थोडे पाणी शिंपडले. लगेचच गाड्यांसाठी हा रस्ता खुला केला. या खड्ड्यामधून गाड्या गेल्याने खड्ड्यात टाकलेले सिमेंट सेट झाले आणि खड्डा बुजला गेला. मात्र हे तंत्रज्ञान डांबरी रस्त्यावर कितपत फायदेशीर आहे हे तपासणे गरजेचे आहे. दरम्यान, याआधी देखील अनेक नवीन तंत्रज्ञान वापरून बुजवलेल्या खड्डयांचे काय झाले असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही वाचा : 

Back to top button