सोलापूर : भावी ‘नवरदेवां’ची वरात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात! | पुढारी

सोलापूर : भावी 'नवरदेवां'ची वरात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात!

सोलापूर, पुढारी वृत्‍तसेवा : अलिकडे मुली आणि मुलाच्या लिंग गुणोत्तरामध्ये मोठी तफावत निर्माण झाले आहे. त्यामुळे समाजिक असमतोल निर्माण झाला आहे. याचा परिणाम म्हणून सध्या समाजातील नव युवकांच्या लग्नासाठी मुली मिळणे कठीण झाले आहे. अनेक तरुण लग्नासाठीची वयोमर्यादा ओलांडून गेली तरी त्यांची लग्ने होत नाहीत, त्यामुळे शासनाने याची दखल घ्यावी, अशी मागणी माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

सध्या मुलांची वेळवर लग्न होत नाहीत म्हणून त्या मुलाचे आई-वडील चितेंत आहेत. दुसरीकडे तरुणांनाही या प्रश्‍नाची चिंता आहे. लग्‍न न होणे ही एक मोठी सामाजिक समस्या बनली आहे. यामुळे समाजात अनुचित प्रकारामध्ये झालेली वाढ चिंताजनक आहे. यावर तातडीने मार्ग काढायला हवा आणि ती शासनाची जबाबदारी असल्याचे, या निवेदनात म्हटले आहे. या वेळी सोलापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भावी नवरदेवांनी  वाजत गाजत वरात काढली. यावेळी मंडळ्या बांधून वर घोड्यावर बसून या आंदोलनात सहभागी झाले होते.

हेही वाचा :  

Back to top button