ठाणे : गणेशमूर्ती 20 टक्क्यांनी महागल्या | पुढारी

ठाणे : गणेशमूर्ती 20 टक्क्यांनी महागल्या

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा :  गेल्या दोन वर्षांत सण-उत्सव सध्या पद्धतीने साजरे होत होत आहेत. मात्र कोरोनाचे संकट टळल्यानंतर भक्त मोठ्या उत्सवात साजरा करताना दिसतात. येत्या दोन दिवसांनी श्री गणेशाचे आगमन होणार असल्याने भक्तांमध्ये आनंदी वातावरण
आहे. कोरोनामुळे आर्थिक मंदी वाढल्याने यावर्षी कल्याणडोंबिवलीत श्री गणेशाच्या मूर्ती 20 टक्क्यांनी महागल्या आहेत. तर परदेशातही गणेशाच्या मूर्तींना मागणी वाढली आहे.

गणपतीच्या कारखान्यात गणपतीची मूर्ती घेण्यासाठी गणेशभक्तांची नागरिकांची ये-जा सुरू असून सुबक मूर्तींसाठी मागणी जोर धरू लागली आहे. डोंबिवली पूर्वेकडील सर्वेश सभागृहाजवळ खोपडे यांच्या गणपती कारखान्यात मूर्ती पाहण्यासाठी आणि मूर्तीचे बुकिंग
करण्याकरिता भक्‍त येतात. या कारखान्याचे वैशिष्ट्य म्हणजे डोंबिवलीसह कल्याण, ठाणे आणि परदेशातही गणपती मूर्तींना
मागणी होत आहे. या कारखान्यात रत्नजडित गणपती आणि डोळ्यांची आखणी हे वैशिष्ट्य असून कलाकारांची लगबग सुरू आहे. कारखान्यात 500 रुपये पासून 10 हजारांपर्यंत किंमतीच्या गणेश मूर्ती असून पिढ्यानपिढ्या याच दुकानवजा कारखान्यातूनभक्तगण गणपतीची मूर्ती घेऊन जातात, असे खोपडे यांनी सांगितले.

कोरोना काळातील दोन वर्षांनंतर गणेशभक्त वाजतगाजत गणपती बाप्पा आपल्या घरी आणणार आहेत. आम्हीही खूप आतुरतेने बाप्पाना कधी एकदा घरी आणतोय आणि त्याची मनोभावे पूजा करतोय असे झाले आहे. कोरोनाची दोन वर्षे खूपच भयानक होती. पण गणरायाच्या कृपाने जगावरील हे संकट टळले असल्याची भावना डोंबिवलीकर सेजल दळवी हिने व्यक्‍त केली.

Back to top button