

नवी मुंबई : पुढारी वृतसेवा लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला ठाणे जिल्ह्यातील 25 ठाणे लोकसभा मतदारसंघात आज दि. 20 मे 2024 रोजी सकाळी 7.00 वाजल्यापासून सुरुवात झाली. 25 ठाणे मतदारसंघातील एकूण 6 विधानसभा मतदारसंघात दुपारी 1.00 वाजेपर्यंत सरासरी अंदाजे 26.05 टक्के मतदान झाले आहे. ठाणे जिल्ह्यातील 25 ठाणे मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय अंदाजे टक्केवारी पुढीलप्रमाणे…
145 मिरा भाईंदर – 28.39 टक्के
146 ओवळा माजिवडा – 20.18 टक्के
147 कोपरी पाचपाखडी – 29.88 टक्के
148 ठाणे – 29.53 टक्के
150 ऐरोली – 25.07 टक्के
151 बेलापूर – 25.72 टक्के
ही आकडेवारी अंदाजे असून अंतिम आकडेवारी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मिळणार आहे.
हेही वाचा :