गणपतीसाठी ठाण्यातून कोकणात १००१ बस | पुढारी

गणपतीसाठी ठाण्यातून कोकणात १००१ बस

ठाणे पुढारी वृत्तसेवा 

गणपतीसाठी ठाण्यातून कोकणात 1001 बस. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील एस.टी. महामंडळाचा ठाणे विभागांकडून 26 ते 30 ऑगस्ट
दरम्यान, जादा बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती ठाणे विभागाचे विभाग नियंत्रक विनोद भालेराव यांनी दिली. विभागाकडून गौरी गणपतीसाठी जादा वाहतुकीकरिता दि.26.08.22 ते 30.08.22 या कालावधीत नियोजन करण्यात आलेले आहे तसेच परतीची वाहतूक दि.04.ते 09.सप्टेंबर या कालावधीत करण्यात येणार आहे. या करिता विभागातील सर्व आगारामध्ये संगणकीय आरक्षणाची सोय व ग्रुप बुकिंगची सोय करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. संगणकीय आरक्षणाचा व ग्रुप बुकिंगचा कालावधी हा 60 दिवस आधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यावर्षी गौरी गणपती जादा वाहतुकीकरिता 26 ते 30 ऑगस्ट या कालावधीत विभागाकडून 1001 गाड्यांचेॉ नियोजन करण्यात आलेले आहे. त्यानुसार चिपळूण,रत्नागिरी, गुहागर, साखरपा, देवगड, कणकवली, सावंतवाडी, सिंधुदुर्ग या मार्गावर ठाणे विभागातील बोरिवली, भाईंदर, ठाणे, मुलुंड,भांडुप, कल्याण, डोंबिवली,विठ्ठलवाडी या बसस्थानकावरून बसेस सोडण्यात येणार आहे

Back to top button