Madha Lok Sabha Election : माढा लोकसभेसाठी शांततेत मतदानाला सुरूवात | पुढारी

Madha Lok Sabha Election : माढा लोकसभेसाठी शांततेत मतदानाला सुरूवात

माळीनगर : पुढारी वृत्तसेवा माढा लोकसभा मतदारसंघासाठी आज (मंगळवार) दि ७ मे रोजी सकाळी ७ वाजता मतदानाला सुरूवात झाली. उन्हाचा पारा वाढत असताना देखील नागरिक मतदानासाठी घराबाहेर पडले आहेत. महाविकास आघाडीचे माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सहकुटुंब आपल्या मतदानाचा हक्क शंकरनगर येथे बजावला. दरम्यान बिजवडी ता. माळशिरस येथील मतदान केंद्रावर सकाळी दहा वाजता गावातील नवमतदार दिव्यांग तरूणी कांचन दत्तात्रय शिंदे हि आपल्या वडिलांच्या सहकार्याने मतदान करण्यासाठी दाखल झाली. मतदान केंद्रावर व्हीलचेअर उपलब्ध असतानाही तीच्या स्वतःच्या प्रयत्नाने तीच्या जवळील वॉकरच्या सहाय्याने मतदान केंद्रात येऊन तीचा पहिला मतदानाचा अधिकार तीने बजावला.

यावेळी संतोष शिंदे या दिव्यांग तरूणाने देखील उत्साहात मतदानाला हजेरी लावली. देशातील लोकशाही मजबूत करण्यासाठी निवडणूक आयोग नागरिकांना आवाहन करत असतो. अशावेळेस धडधाकट नागरीक देखील कारणे दाखवून मतदानाचा हक्क बजावत नाहीत. परंतू कांचन शिंदे, संतोष शिंदे असे तरूण, तरूणी समाजासमोर मोठा आदर्श निर्माण करत आहेत.

मी पहिल्यांदाच माझा मतदानाचा हक्क बजावला असून सर्वांनी मतदान करावे.
– कांचन शिंदे बिजवडी

Back to top button