एमआयएमला भाजपची टीम म्हणणारे नेते भाजपसोबत : फारूक शाब्दी यांची टीका | पुढारी

एमआयएमला भाजपची टीम म्हणणारे नेते भाजपसोबत : फारूक शाब्दी यांची टीका

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्यात एमआयएमला बी टीम म्हणणारे आज भाजपच्या मांडीवर जाऊन बसलेत. राज्यातील राजकीय परिस्थिती विदारक झाली आहे. कारण आजच्या घडीला काँग्रेसला ,राष्ट्रवादीला किंवा शिवसेनेला मतदान जरी केले तरी ते आपोआप भाजपला जाईल. काँग्रेसचे व राष्ट्रवादीचे अनेक नेते एमआयएमला भाजपची टीम म्हणत होते. तेच नेते आज भाजप बरोबर गेलेत अशी टीका एमआयएम शहराध्यक्ष फारूक शाब्दी यांनी केली.

सोलापूर एमआयएमच्या वतीने बुधवारी रात्री छत्रपती शिवाजी महाराज रंगभवन हॉल येथे संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता. नांदेड येथील मोईन सय्यद संकल्प मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सोलापूर शहर प्रमुख फारूक शाब्दी यांसह एमआयएमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी भाषण करत भाजप,काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीका केली.

फारूक शाब्दी यांनी भाषण करताना, विधानपरिषद सदस्य गोपीचंद पडळकर आणि प्रसाद लाड यांवर सडकून टीका केली. सोलापुरातील एका मशिदीचा मुद्दा ज्यावेळी विधानपरिषदेत उचलला जात होता. त्यावेळी सोलापुरातील विद्यमान आमदार मूग गिळून गप्प का होते.काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी याबाबत आजतागायत एक शब्द देखील प्रतिक्रिया दिली नाही.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन इम्रान हाफिज यांनी केले.प्रस्तावना कोमारु सय्यद यांनी केली. यावेळी नगरसेवक गाझी जहागीरदार, नगरसेवक नसिम खलिफा, नगरसेवक अझहर हुंडेकरी, दौला कुमठे, इलियास शेख, इक्बाल पठान, नासिर मंगलगीरी, सलमा सय्यद, नसिमा कुरेशी, अनिसा मोगल, अनिसा डोका, युवाध्यक्ष मोहसिन मैंदर्गीकर, शोहेब चौधरी, इरफान दावन्ना , हारीस कुरेशी, इसामोद्दीन पिरजादे, जावेद शेख, जुबेर शेख, अशपाक बागवान, वसिम शेख, कम्मो शेख, इम्रान हवालदार, सरफराज शेख, अझहर कोरबु, फारुख शेख MR, सलिम बेलिफ, अनिस निटोरे, बशिर सय्यद, नदिम डोनगांवकर, जावेद वास्तव, मुश्ताक कानकुर्ती, मचिंद्र लोकेकर, विक्रम वाडेकर, सरफराज शेख मुजम्मिल वड्डो, मुसद्दीक शेख, मझहर कोरबु अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

नांदेडच्या जनतेला धोका देऊन अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला

एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष मोईन सय्यद म्हणाले, नांदेड येथे एमआयएम पक्षाच काम करताना काँग्रेस तत्कालीन नेते अशोक चव्हाण यांनी सर्वात जास्त त्रास दिला. अनेक खोट्या गुन्ह्यात मला अडकवण्याचे काम केले.सद्यस्थितीत अशोक चव्हाण नांदेडच्या जनतेला धोका देत भाजप प्रवेश केला असे सांगत मोईन सय्यद यांनी अशोक चव्हाणसह काँग्रेसवर निशाणा साधला.

Back to top button